maharashtra

इलेक्ट्रिक मोटरची चोरी


Electric motor theft
देगाव, ता. सातारा गावच्या हद्दीत शिवारातून अज्ञात चोरट्याने तिन एचपीची मोटर लंपास केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : देगाव, ता. सातारा गावच्या हद्दीत शिवारातून अज्ञात चोरट्याने तिन एचपीची मोटर लंपास केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 फेब्रुवारी ते दि. 27 फेब्रुवारी  देगाव गावच्या हद्दीत असणार्‍या दोदन खोरे नावाच्या शिवारातुन अज्ञात चोरट्याने 15 हजार रुपये किमतीची तीन एचपीची इलेक्ट्रिक मोटर लंपास केल्याची तक्रार भाऊसो छगन हराळे, रा. देगाव यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली. अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे.