महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

माणचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांची उचलबांगडी ?

माण तालुक्यात होत असलेल्या अनधिकृत वाळू उपशाबाबत प्रसार माध्यमांनी गेल्या महिन्यात सातत्याने आवाज उठवला होता. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. वाळूमाफियांना अभय देत पोलीस ठाण्यात खोटी तक्रार देणारे एक प्रकरण उघड झाल्यानंतर वाकीचा तलाठी संतोष ढोले, तहसीलदार सूर्यकांत येवले व प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांना कारणे दाखवा नोटीस बजावत आपणावर शिस्तभंगाची कारवाई का करू नये, अशी विचारणा करण्यात आली आहे. तर तहसीलदार सूर्यकांत येवले यांची उचलबांगडी केल्याची चर्चा असून त्यांच्या जागी रिचर्ड यानथन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

दादा महाराजांचे लोककल्याणकारी विचार आजही प्रेरणादायी

श्रीमंत छत्रपती प्रताप सिंह उर्फ दादा महाराज यांनी नगराध्यक्ष म्हणून सातारा शहरासाठी काम करताना लोककल्याणाचा विचार नेहमी समोर ठेवला. त्यांचे विचार आजच्या राजकारणातही आम्हाला सातत्याने प्रेरणादायी ठरत आहेत, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहराजे उर्फ दादा महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त उदयनराजे यांनी अभिवादन केले.

esahas.com
महाराष्ट्र

बोरगाव अपघातात एक ठार

पुणे-बंगळुर महामार्गावर ट्रकला पाठीमागून दुचाकीने धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर त्याच्या पाठीमागे बसलेला गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवार, दि. १ मार्च रोजी अतित ता.सातारा गावच्या हद्दीत घडली. याबाबतची नोंद बोरगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाची नागठाणे येथे कारवाई

नागठाणे, ता.जि.सातारा गावच्या हद्दीत बाबा पंजाबी ढाब्याच्या पाठीमागे बेकायदा क्लोरेल हायड्रेड चा वापर करुन बनावट ताडी तसेच मानवी शरीरास घातक व विषारी क्लोरेल हायड्रेट तयार करणा-या कारखान्यावर छापा टाकून संबंधितांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग, सातारा अधीक्षक अनिल चासकर यांनी दिली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

हृदयविकाराने एसटी चालकाचा मृत्यू

हृदयविकाराने छातीत दुखत असल्याने एसटी चालक हणमंत राजाराम सुर्यवंशी वय ५१ रा. पिलेश्वरीनगर म्हसवेरोड करंजे तर्फे सातारा यांना प्राथमिक उपचार खासगी रुग्णालयात केल्यानंतर अधिक उपचारासाठी क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

esahas.com
महाराष्ट्र

अत्याचाराच्या घटनांनी सातारा हादरला

सातारा जिल्ह्यात दोघा अल्पवयीन मुलींसह एका युवतीवर अत्याचार झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी संबंधितांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

मसूरमध्ये दरोडा; डॉक्टर दाम्पत्यास मारहाण

मसूर, ता.कराड येथे मंगळवार दि. १ रोजी मध्यरात्री दरोडेखोरांनी डॉक्टर दाम्प्त्यास मारहाण करत दागिन्‍यांसह रोकड लंपास केली. जखमी डॉक्टर दाम्प्त्यावर कराडमधील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संपत वारे व अनिता वारे अशी त्‍यांची नावे आहेत.

esahas.com
महाराष्ट्र

सातारा येथील मंदिरातील दानपेटीवर चोरट्याचा डल्ला

येथील केसकर पेटेत असणाऱ्या एका मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारत चोरट्याने त्यातील २५ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

वनमजुरांना शासन सेवेत कायम करा

वनमजुरांना शासन सेवेत कायम करा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य वनमजूर, वनकामगार, वनपाल आणि जनरल युनियनने सातारा नगरपालिका ते पवई नाका येथे विनंती पायी मोर्चा काढुन येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले. उद्या गुरुवार दि. ३ मार्च रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती युनियनने दिली.

esahas.com
महाराष्ट्र

युक्रेन देशातून पाच विद्यार्थी सुखरूप सातारा जिल्ह्यात दाखल

युक्रेन देशात सातारा जिल्ह्यातुन वेगवेगळ्या महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या १९ विद्यार्थ्यांपैकी ५ विद्यार्थी आज त्यांच्या घरी सुखरूप परतले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाचे आभार मानले असून उर्वरित १४ विद्यार्थी लवकरच जिल्ह्यात दाखल होण्याची शक्यता आहे.