maharashtra

खानापूर येथे दुकान फोडून साहित्य लंपास


The shop was robbed into Khanapur
खानापूर, ता. वाई येथील दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम व किराणा साहित्य चोरून नेल्याची तक्रार भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

वाई : खानापूर, ता. वाई येथील दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम व किराणा साहित्य चोरून नेल्याची तक्रार भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  दि. ३ मार्च रोजी ९.१५ वाजण्याच्या सुमारास खानापूर फाटा ते खानापूर जाणाऱ्या रस्त्यावर असणाऱ्या पद्मश्री कम्युनिकेशन व किराणा जनरल स्टोअर्स नावाचे बंद दुकानाच्या शटरचे कुलूप उघडून आत प्रवेश करून अज्ञात चोरट्याने रोख रक्कम व किराणाचे साहित्य असे एकूण ४ हजार ६३६ रुपयांचे साहित्य लंपास केल्याची तक्रार उमेश जाधव यांनी भुईंज पोलीस ठाण्यात दिली आहे.