maharashtra

खासगी ट्रॅव्हल्समधुन ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस

गोरेगाव ते बॉम्बे रेस्टॉरंट दरम्यानची घटना

Property worth Rs 65,000 stolen from private travels
गोरेगाव (मुंबई) ते कराड दरम्यान खासगी ट्रॅव्हल्समधुन प्रवास करत असताना एका महिलेचा ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली. ही घटना खासगी ट्रॅव्हल्स सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात आल्यानंतर उघडकीस आली. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.

सातारा : गोरेगाव (मुंबई) ते कराड दरम्यान खासगी ट्रॅव्हल्समधुन प्रवास करत असताना एका महिलेचा ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली. ही घटना खासगी ट्रॅव्हल्स सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात आल्यानंतर उघडकीस आली. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २ मार्च रोजी ११ ते दि.३ मार्च २०२२ रोजी ६ वाजण्याच्या दरम्यान राजश्री व्यंकटेश पाटील, वय ३६, रा. विंग भवानी बिल्डींग, नागरी निवारा परिषद, गोरेगाव पूर्व, मुंबई ही महिला कार्तिकी ट्रॅव्हल्स क्रमांक एम. एच. ०९ - इसी ३४३४ मधून गोरेगाव ते कराड असा प्रवास करत असताना ट्रॅव्हल्स सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट येथे आली असता अज्ञात चोरट्यांनी त्यांचा २० हजार रुपये किमतीचा मोबाइल, १० हजार रुपये किमतीचा दुसरा मोबाइल, ७ हजार रुपये किमतीचे वायफाय डोंगल, १० हजार रुपयांची सोन्याची कर्णफुले,  १० हजार ५०० रुपये रोख रक्कम असा ६२ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून गेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. या घटनेची नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.