चोरीला गेलेली जमीन शोधून मिळण्यासाठी सातारा येथे अहिर, ता. महाबळेश्वर येथील सपकाळ कुटुंबीयांनी आजपासून आंदोलन सुरू केले आहे. आम्हाला न्याय न मिळाल्यास दि. 14 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर आत्मदहन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
सातारा : चोरीला गेलेली जमीन शोधून मिळण्यासाठी सातारा येथे अहिर, ता. महाबळेश्वर येथील सपकाळ कुटुंबीयांनी आजपासून आंदोलन सुरू केले आहे. आम्हाला न्याय न मिळाल्यास दि. 14 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर आत्मदहन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, कोयना धरणाची निर्मिती सुरू असताना पांडु विठू टू सपकाळ रा. अहिर, ता. महाबळेश्वर यांच्या मालकीची 1.85 हेक्टर जमीन धरणात बुडाली. तद्नंतर त्याच्या बदल्यात त्यांना कोल्हापूर जिल्ह्यातील माहुर तालुक्यात जमीन मंजूर करण्यात आले असल्याचे सांगितले. त्यांनी तेथे जाऊन जमिनीबाबत खात्री केली असता त्यांच्या नावे जमीन असल्याची कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाहीत. त्यामुळे सकाळ कुटुंबीयांनी जमीन चोरीस गेल्याचा निष्कर्ष काढला आहे. कोयना धरणाच्या निर्मितीला 60 वर्ष पूर्ण होऊनही सपकाळ कुटुंबीय अद्याप जमिनीच्या प्रतीक्षेत असल्याने बुडीत क्षेत्रात गेलेल्या जमिनीच्या मोबदल्यात आम्हाला जमीन देण्यात यावी या मागणीसाठी या कुटुंबीयांनी सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारा बाहेर आजपासुन आंदोलन सुरू केले आहे. न्याय न मिळाल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी दि. 14 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर आत्मदहन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.


