सातारा जिल्ह्यात इयत्ता बारावीच्या परीक्षेला प्रारंभ
पहिल्या दिवशी कोठेही अनुचित प्रकार नाही ; प्रभावती कोळेकर यांच्या पाच केंद्रांना भेटी
सातारा जिल्ह्यात इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून प्रारंभ झाला असून पहिल्या दिवशी कोणत्याही परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती शिक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी ५ केंद्र व उपकेंद्र यांना भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली. खबरदारीचा उपाय म्हणून सर्वच परीक्षा केंद्रांवर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.
सातारा : सातारा जिल्ह्यात इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून प्रारंभ झाला असून पहिल्या दिवशी कोणत्याही परीक्षा केंद्रावर अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती शिक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी ५ केंद्र व उपकेंद्र यांना भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली. खबरदारीचा उपाय म्हणून सर्वच परीक्षा केंद्रांवर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.
सातारा जिल्ह्यात इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या ३७ हजार ५०७ एवढी असून मूळ केंद्रे ५० तर उपकेंद्रे २२२ एवढी आहेत. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर सात भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. ५० केंद्र संचालक, १ हजार ५०० पर्यवेक्षक, २२२ उपकेंद्र संचालक, ३२२ शिपाई, २७२ लेखनिक, पेपर ने- आच करण्यासाठी २२२ रनर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व केंद्रावर परीक्षा दरम्यान विद्यार्थ्यांना मुबलक वीज व पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
परीक्षेदरम्यान माध्यमिक शिक्षण अधिकारी प्रभावती कोळेकर यांनी अपशिंगे नागठाणे अतीत पाली तारळे या पाच परीक्षा केंद्र व उपकेंद्र यांना भेटी दिल्या. या भेटीदरम्यान नागठाणे केंद्रावर ३५९ पैकी ३५४, अतित उपकेंद्रावर ३७ पैकी ३२, तारळे उपकेंद्रावर १११ पैकी १११ परीक्षार्थी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करूनच त्यांना परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला गेला. आज परीक्षेच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडला असल्याची माहिती प्रभावती कोळेकर यांनी दिली.


