maharashtra

लग्नाचे आमिष दाखवून सातारा शहर परिसरातील एका युवतीवर अत्याचार


Atrocities on a young woman in Satara city area by showing the lure of marriage
सातारा शहर परिसरात वास्तव्य करणार्‍या एका युवतीला लग्नाचे आमिष दाखवून  तिच्यावर सातारा शहर परिसरात एकाने अत्याचार केल्याची तक्रार शाहुपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : सातारा शहर परिसरात वास्तव्य करणार्‍या एका युवतीला लग्नाचे आमिष दाखवून  तिच्यावर सातारा शहर परिसरात एकाने अत्याचार केल्याची तक्रार शाहुपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  ऋतिक शांताराम दौडमणी, रा. लक्ष्मी टेकडी, सदरबझार, सातारा याने सातारा शहर परिसरात वास्तव्य करत असणाऱ्या एका युवतीला लग्नाचे आमिष दाखवले होते. आमिष दाखवत त्याने ऑगस्ट २०२१ ते २ मार्च २०२२ पर्यंत सज्जनगड येथील मंदिर परिसर, शाहूपुरी, ठोसेघर, ता. सातारा आणि जेजुरी, ता. पुरंदर येथून येत असताना सातारा शहर परिसरात तु माझ्याशी शरीरसंबंध ठेवले नाहीस, तर मी जीवाचे बरे वाईट करून घेईन अशी धमकी देऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर संबंधित युवतीने लग्न कर अशी मागणी केल्यानंतर त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. त्याच्या त्रासाला कंटाळून तिने विषारी औषध खाल्ले असल्याची तक्रार शाहुपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. ऋतिक शांताराम दौडमणी त्याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला असून अद्याप त्याला अटक करण्यात आली नाही.