जाधववाडी, ता. सातारा येथे घरफोडी करून ७१ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालाची अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : जाधववाडी, ता. सातारा येथे घरफोडी करून ७१ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालाची अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २ मार्च रोजी ९ वाजण्याच्या सुमारास जाधववाडी, ता. सातारा येथील नितीन शंकर शिंदे यांच्या बंद घराच्या किचनच्या दरवाजाचा कडी-कोंयडा कशाने तरी तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील सोन्याचे दागिने, मोबाइल, रोख रक्कम असा ७१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.


