वाई-मेणवली रस्त्यावर हॉटेल राजयुग जवळून पोलिसांनी पाचजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून अवैध पिस्तूल जप्त केले आहे. यावेळी सातारा येथील एक तडीपार गुंड पळून जाण्यात यशस्वी ठरला.
वाई : वाई-मेणवली रस्त्यावर हॉटेल राजयुग जवळून पोलिसांनी पाचजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून अवैध पिस्तूल जप्त केले आहे. यावेळी सातारा येथील एक तडीपार गुंड पळून जाण्यात यशस्वी ठरला.
मेणवली रस्त्यावर हॉटेल राजयुग जवळ पांढर्या रंगाची विना नंबर प्लेटची फॉर्च्युनर गाडी उभी असून यामध्ये पाच सहा जण संशयित बसलेले आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता सागर संदीप साबळे (सातारा) हा तडीपार गुंड पळून गेला. त्यावेळी पोलिसांनी साहिल अय्याज इनामदार (वय 23, सातारा), राहुल अशोक कदम (28, खोजेवाडी, सातारा), महेंद्र लक्ष्मण गायकवाड ( 28, खोजेवाडी), सागर अनिल पडवळ (27,शेंद्रे ता सातारा), साद अय्याज बागवान (17, गुरुवार पेठ, सातारा) या पाच जणांना तांब्यात घेतले. त्याच्याकडे अवैध पिस्तूल सापडले ते पोलिसांनी जप्त केले. पोलिसांनी फॉर्च्युनर गाडीही जप्त केली आहे
सागर संदीप साबळे हा सातारा जिल्ह्यातुन नुकताच तडीपार केलेला गुंड असून साहिल अय्याज इनामदार हा सुद्धा तडीपार होता. याची तडीपारी नुकतीच संपली आहे. वरील पाच जणांकडे पोलिसांनी चौकशी केली असता सागर साबळे बरोबर पाचगणीला जेवायला निघाल्याचे सांगितले. येथील राजयुग हॉटेलचा मालक सचिन येवले हा सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून तडीपार आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, उपनिरीक्षक कृष्णा पवार, सहायक उपनिरीक्षक विजय शिर्के, किरण निबाळकर, श्रावण राठोड, प्रसाद दुदुस्कर, रेखा तांबे, ज्योती सुतार, सागर धुमाळ, सुमित मोहिते, अक्षय नेवसे, हेमंत शिंदे यांनी भाग घेतला. याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे, पोलीस उपअधीक्षक (वाई) डॉ. शितल जानवे खराडे यांना कळविण्यात आली. तसेच ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.


