वाठार, ता. कराड येथे पुणे-बेंगलोर महामार्गावर टेंपोचा अचानक टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटून टेंपो महामार्गावर पलटी झाला. या अपघातात मालासह वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मंगळवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
१५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी महाबळेश्वर येथील तहसील कार्यालयात अव्वल कारकून म्हणून काम करणार्या अमोल अशोक सलागरे याला आज न्यायालयाने ४ वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी, मसूर, वडूज भागात घरफोडी करणार्या पाच जणांच्या बीड जिल्ह्यातील टोळीला सातारा पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले. कसून झालेल्या चौकशीत त्यांनी पाच घरफोड्या केल्याचे मान्य केले असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा व वडूज पोलीसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
सातारा शहरातील गुरुवार परज येथे मटका आणि जुगार अड्डा चालवणाऱ्या चारजणांना सहा महिन्यासाठी सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी हे आदेश मंगळवारी पारित केले.
बजाजनगर, जि. संभाजीनगर (औरंगाबाद) येथील शिवा सिध्देश्वर महादेव मंदिरातील बसवेश्वर पुतळा विटंबन घटनेचे पडसाद सातार्यातही उमटले आहेत. शिवा आखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्यावतीने या घटनेचा तीव्र निषेध करुन जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
अवघ्या चार वर्षांपूर्वी सातारा पालिकेने खरेदी केलेल्या घंटागाड्या पुरेशा देखभालीअभावी भंगारमध्ये निघू लागल्या आहेत. पालिकेच्या हुतात्मा उद्यान येथे या गाड्या अतिशय नादुरुस्त अवस्थेत उभ्या असून काही घंटागाड्यांच्या बॅटर्या चोरीला गेल्याने या गाड्या म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे.
माण तालुक्यात झालेली घटना ताजी असताना मंडल अधिकारी पुसेसावळी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत असे काम केले आहे. मंडल अधिकारांचे सूडबुद्धी कामच फटका या शेतकऱ्यास गेली ३ वर्ष होत असून त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक तसेच मानसिक मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
राममोहन खारकर हे साताऱ्यातील वकील आपल्या चारचाकी गाडीतून घरी जात असताना शाहूनगर परिसरात 5-6 इसमांनी रस्त्यात गाडी आडवी लावलेली असल्याने राममोहन ह्यांनी गाडी थांबवून त्या इसमांना मध्ये लावलेली गाडी रस्त्यावरून हटविण्याची विनंती केली. ह्यानंतर त्या इसमांपैकी एकाने लोखंडी गजाने वकीलांच्या गाडीची मागील काच फोडली. दरम्यान, गाडीच्या डाव्या बाजूच्या खिडकीतून ह्या इसमांपैकी एकजण पीडित वकीलांशी बोलत असताना उजव्या बाजूच्या खिडकीतून दुसऱ्या इसमाने लोखंडी गज वकीलांच्या डोळ्यावर मारला. हा मार इतका जबर होता की, काल पीडित वकीलाचा डोळा काढावा लागला.
कटगुण, ता. खटाव येथून चोरीस गेलेल्या 52 हजार किमतीच्या मोटारसायकलचा छडा लावून या घटनेतील संशयितास अटक करण्यात पुसेगाव पोलिसांना यश मिळाले आहे.
जुन्या केसच्या कारणावरून सातारा येथील एका महिलेला मारहाण झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याबाबत तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.