maharashtra

सातारा शहरात मटका अड्डा चालवणारे चारजण तडीपार

पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची कारवाई

Tadipar, four people running Matka Adda in Satara city
सातारा शहरातील गुरुवार परज येथे मटका आणि जुगार अड्डा चालवणाऱ्या चारजणांना सहा महिन्यासाठी सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी हे आदेश मंगळवारी पारित केले.

सातारा : सातारा शहरातील गुरुवार परज येथे मटका आणि जुगार अड्डा चालवणाऱ्या चारजणांना सहा महिन्यासाठी सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी हे आदेश मंगळवारी पारित केले.
यासीन इक्बाल शेख टोळी प्रमुख वय 38, इनायत मोहम्मद अली शेख वय 47 गुरुवार पेठ, राज अमोल सांडगे रा. 417 मंगळवार पेठ, जयसिंग हनुमंत भोसले वय 33 रा. 65 केसरकर पेठ या चौघांना सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. सातारा शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आणि हिंसक कारवाया टाळणे याकरिता ही कारवाई करण्यात आली आहे.
शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी हा प्रस्ताव सादर केला होता. हद्दपार प्राधिकरणाच्या या प्रक्रियेत अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित बोर्‍हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव, प्रमोद सावंत, केतन शिंदे यांनी या कामी सहकार्य केले. पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी आत्तापर्यंत 29 प्रस्तावाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातून 107 जणांना तडीपार केले आहे.