सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी, मसूर, वडूज भागात घरफोडी करणार्या पाच जणांच्या बीड जिल्ह्यातील टोळीला सातारा पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले. कसून झालेल्या चौकशीत त्यांनी पाच घरफोड्या केल्याचे मान्य केले असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा व वडूज पोलीसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
सातारा : सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी, मसूर, वडूज भागात घरफोडी करणार्या पाच जणांच्या बीड जिल्ह्यातील टोळीला सातारा पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले. कसून झालेल्या चौकशीत त्यांनी पाच घरफोड्या केल्याचे मान्य केले असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा व वडूज पोलीसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
सातारा जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून ग्रामीण भागात छोट्या-मोठ्या चोर्या होत होत्या. त्यातूनच काही ठिकाणी दरोड्याच्या घटना घडल्या. यामध्ये पाच जानेवारीस पुसेसावळी (ता. खटाव) येथील दरोड्यात एकूण 5 लाख 20 हजार रुपयांचे दागिने गेल्याची फिर्याद संजय आप्पासो कदम यांनी नोंदवली होती. दोन मार्चला संतोषीमातानगर (मसूर) येथील पूजा वारे यांच्या घरात पडलेल्या दरोड्यात 4 लाख 89 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. 11 मार्चला वडूज येथील शिवाजी भिकू ननावरे यांनी एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची तक्रार पोलिसांत केली होती.
या गुन्ह्यांचा कसून तपास करावा, असे आदेश पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखा तसेच संबंधित पोलीस ठाण्यांना दिले होते. त्यानुसार एलसीबीने वडूजला ज्या ठिकाणी घटना घडली तेथे भेट दिली. तेथून तपासाची चक्रे फिरवत कर्जत, बीड पर्यंत गुन्हेगारांचे धागेदोरे असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे, दहिवडीचे पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, वडूज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मालोजीराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या अधिपत्याखाली माहिती घेत सातारा स्थानिक गुन्हे शाखा पथक आणि वडूज पोलिसांनी माहिजळगाव, कर्जत (जि. नगर) आणि आष्टी (जि. बीड) येथे जाऊन पाच संशयित आरोपींना अटक केली. अटक केलेल्या संशयितांनी पाच घरफोड्यांची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
अविनाश उर्फ काल्या सुभाष भोसले (वय 24), अजय सुभाष भोसले (वय 22), सचिन सुभाष भोसले (वय 21, तिघेही रा. माहिजळगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर) तसेच राहूल पदु भोसले (वय 28, रा. वाळुंज, पो. बाबुर्डी, ता.जि. अहमदनगर) आणि होमराज काळे (वय 25, रा. वाकी, ता. आष्टी, बीड) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे, दहिवडीचे पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, वडूज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मालोजीराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उप निरीक्षक गणेश वाघ, मधुकर गुरव, मदन फाळके स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार तानाजी माने, उत्तम दबडे, कांतीलाल नवघणे, विश्वनाथ संकपाळ, विजय कांबळे, संजय शिर्क, आतिश घाडगे, संतोष सपकाळ, संतोष पवार, शरद बेबले, प्रविण फडतरे, लक्ष्मण जगधने, निलेश काटकर, मुनीर मुल्ला, प्रविण कांबळे, गणेश कापरे, अमित सपकाळ, अमोल माने, विक्रम पिसाळ, स्वप्नील माने, मोहन पवार, मयुर देशमुख, मोहसीन मोमीन, विशाल पवार, केतन शिंदे, रोहित निकम, सचिन ससाने, प्रविण पवार, पृथ्वीराज जाधव, प्रविण कांबळे, गणेश कचरे, पंकज बेसके, सुशांत कदम, महेश पवार, अनिकेत जाधव, प्रविण आहिरे, यशोमती साळुंखे, ज्योती कोंढावळे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय वडुज व वडुज पोलीस स्टेशन येथील पोलीस अंमलदार रमेश बर्गे, दिपक देवकर, संदीप शेडगे, भुषण माने, दर्याबा नरळे, भार्गव पवार, संतोष काळे, संदीप चव्हान, सागर बरडे, होमगार्ड उमाजी पाटोळे यांनी केली आहे.


