beedgangarrestedforburglaryinsataradistrict

esahas.com

सातारा जिल्ह्यात घरफोडी करणारी बीडची टोळी जेरबंद

सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी, मसूर, वडूज भागात घरफोडी करणार्‍या पाच जणांच्या बीड जिल्ह्यातील टोळीला सातारा पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले. कसून झालेल्या चौकशीत त्यांनी पाच घरफोड्या केल्याचे मान्य केले असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा व वडूज पोलीसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.