खटाव तहसील मध्ये चहा पेक्षा किटली गरम, तहसीलदारांचे आदेशाला मंडल अधिकारी कडून केराची टोपली
माण तालुक्यात झालेली घटना ताजी असताना मंडल अधिकारी पुसेसावळी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत असे काम केले आहे. मंडल अधिकारांचे सूडबुद्धी कामच फटका या शेतकऱ्यास गेली ३ वर्ष होत असून त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक तसेच मानसिक मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वडूज तहसीलदारानी उंचीठाने हद्दीतील सर्व्हे नंबर ८९/१/अ या क्षेत्रास १४५ कलम लागू केले होते परंतु संबंधित शेतकऱ्याकडे सातारा जिल्हा कोर्टाचा हा क्षेत्रास कोणत्याही प्रकारचा तहयात अडथळा निर्माण करू नये असा आदेश असलेचे निदर्शनात येताच वडूज तहसीलदार यांनी १४५ कलम रद्द करण्याचा आदेश दिला परंतु या कालावधीमध्ये मुख्यरस्ता ते संबंधीत क्षेत्रापर्यंतचा रास्ता नष्ट केल्याचे दिसून आले त्यानुसार शेतकऱ्याने वडूज तहसीलदार याना नष्ट केलेला रास्ता पुन्हा खुला करून देण्याचा अर्ज केला व त्यास वडूज तहसीलदार यांनी मंडल अधिकारी पुसेसावळी याना व भूमापन अधिकारी वडूज याना रस्त्याच्या हद्दी दाखवावेत आणि रस्ता खुला करून देण्याचा आदेश दिला होता परंतु मंडल अधिकारी यांनी तहसीलदार वडूज यांनी काम बंद करण्याचे तोंडी आदेश दिला आहे असे बोलून कामात हलगर्जी पण करीत काम बंद करण्याचा आदेश देत घटनस्थळावरून पलायन केले. वास्तवामध्ये वडूज तहसीलदार यांनी अशा प्रकारचा कोणताही आदेश दिला नसून मंडल अधिकारी यांनी कोणत्या शक्तीचा वापर करून घटनस्थळावरून पलायन केले याची उच्यस्तरीय चौकशी करून कामात हलगर्जी पणाचा ठपका ठेवून जोपर्यंत चौकशी होत नाही तो पर्यंत मंडल अधिकारी पुसेसावळी यांचे निलंबन करण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्याने केली असून अशा भ्रष्ट अधिकारी महसुली कायद्यांचा चुकीचा वापर करून स्वतःला दिलेल्या अधिकारांचा गैरवापर करीत असताना दिसत आहेत. आत्ताच झालेल्या माण तालुक्यात झालेली घटना ताजी असताना मंडल अधिकारी पुसेसावळी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत असे काम केले आहे. मंडल अधिकारांचे सूडबुद्धी कामच फटका या शेतकऱ्यास गेली ३ वर्ष होत असून त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक तसेच मानसिक मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पाणंद रस्ता योजना असताना मंडल अधिकारी पुसेसावळी यांच्यासारख्या भ्रष्ट अधिकारणेमुळे चांगल्या योजनेचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचत नाहीत. मंडल अधिकारी जर तहसीलदार यांचे आदेश मोडीत काडत असेल तर हि बाब गांभीर्याने घेऊन अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर सेवासमाप्ती सारखी कडक कारवाई केली पाहिजे ज्यातून अशा प्रव्रिस प्रवृत्तीस आळा बसेल. त्याच बरोबर भ्रष्टचार करणारे वर देशद्रोव्हासारखे कडक कलमे दखल केली पाहिजेत
श्री. महारुद्र तिकुंडे , माहिती अधिकार , संस्थापक - अध्यक्ष, युवराज फौंडेशन


