१५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी महाबळेश्वर येथील तहसील कार्यालयात अव्वल कारकून म्हणून काम करणार्या अमोल अशोक सलागरे याला आज न्यायालयाने ४ वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
सातारा : १५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी महाबळेश्वर येथील तहसील कार्यालयात अव्वल कारकून म्हणून काम करणार्या अमोल अशोक सलागरे याला आज न्यायालयाने ४ वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, अमोल सलगरे याने वाहनधारक यांच्या अधिग्रहण वाहनांची बिले करण्यासाठी प्रत्येक वाहना पाठीमागे ३०० रुपये असे एकूण १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत संबंधित तक्रारदारांनी २९ मार्च २०१७ साली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर तक्रारीत तथ्य असल्याचे स्पष्ट झाल्याने दि. ३० मार्च २०१७ रोजी तक्रारदाराकडुन महाबळेश्वर येथील तहसील कार्यालयाच्या सेतू विभागात २५ हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला रंगेहात पकडले होते. त्याच्यावर महाबळेश्वर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर सातारा येथील न्यायालयात त्याच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. आज सातारा येथील न्यायालयात विशेष न्यायाधीश एल. एन. मोरे यांनी अमोल सलागरे याला ४ वर्षे सक्तमजुरी आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.


