maharashtra

औरंगाबादमधील पुतळा विटंबना घटनेचा सातार्‍यात निषेध


Protest in Aurangabad over statue desecration incident in Aurangabad
बजाजनगर, जि. संभाजीनगर (औरंगाबाद) येथील शिवा सिध्देश्वर महादेव मंदिरातील बसवेश्वर पुतळा विटंबन घटनेचे पडसाद सातार्‍यातही उमटले आहेत. शिवा आखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्यावतीने या घटनेचा तीव्र निषेध करुन जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.

सातारा : बजाजनगर, जि. संभाजीनगर (औरंगाबाद) येथील शिवा सिध्देश्वर महादेव मंदिरातील बसवेश्वर पुतळा विटंबन घटनेचे पडसाद सातार्‍यातही उमटले आहेत. शिवा आखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्यावतीने या घटनेचा तीव्र निषेध करुन जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
मंगळवार दि. 8 मार्च रोजी काही विकृत मनोवृत्तींच्या कैलास भोकरे व साथीदारांनी बजाजनगर, जि. संभाजीनगर (औरंगाबाद) येथील शिवा सिध्देश्वर महादेव मंदिरातील बसवेश्वर पुतळ्याची तोडफोड केली आहे. देशातील महापुरुषांचा आदर केला जात असताना पुतळ्याच्या विटंबनेची घटना लोकशाही आणि मानवतेला काळीमा फासणारी आहे. गुंड प्रवृत्तीच्या कैलास भोकरे व त्याच्या साथीदारांना अटक करुन त्यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कडक कारवाई करावी. तसेच एमआयडीसीची जागा हडपण्यासाठी भोकरे याला मदत करणार्‍या अधिकार्‍यांची चौकशी करुन त्यांना निलंबित करावे, अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. यावेळी शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील निदान, सिध्दलिंग स्वामी, रत्नाकर शेटे, अशोक निदान, संतोष वाकडे, श्रीनिवास खराडे, गोविंद म्हमाणे, शत्रुघ्न गाडवे, किशोर चिनेक, वैभव राऊत उपस्थित होते.