सातारा शहरातील किल्ले अजिंक्यतारा पायथ्याशी असलेल्या नलवडे कॉलनी, शाहूनगरमध्ये वृध्द महिलेला अनोळखी दोघांनी फसवणूक करत हातचलाखीने 5 तोळे सोन्याचा ऐवज चोरुन नेला. या घटनेने ज्येष्ठ नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पुणे शहरात महिला फौजदार म्हणून कर्तव्य बजावत असलेल्या प्रियांका निकम यांनी पतीसह एकूण ६ जणांवर जाचहट, फसवणूक व गळा दाबल्याप्रकरणी तक्रार दिली आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस अधिकार्याच्या या तक्रारीने खळबळ उडाली आहे.
शहरासह हद्दवाढ भागासाठी शासनाकडून वेळोवेळी निधी प्राप्त होत आहे. त्यामुळे विकासकामांमध्ये कोणताही अडथळा राहिलेला नाही . प्रशासनाने नियोजित व हद्दवाढ भागातील पायाभूत कामे तातडीने हाती घेऊन ती मार्गी लावावीत,’ अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी केल्या.
वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने सातारा शहरात 12 ते 20 मे 2022 या कालावधीत विशेष मोहिम राबवून वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक व्ही.एल. शेलार यांनी दिली आहे.
सातारा शहरात ओढ्यांवरील अतिक्रमणांच्या वाढत्या संख्येबाबत पालिका प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून गांधारीच्या भूमिकेत गेल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दलित वस्ती सुधार योजना या गोंडस नावाखाली समाजकल्याण विभाग मार्फत दर वर्षी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात.त्यामध्ये ठराविक धनदांडगे ठेकेदारांचे उकळ पांढरे होते पण त्या विकासकामांचा फायदा दलित समाजाला होत नाही. अशा कामांची चौकशी करावी, अशी मागणी कातर खटाव ग्रामपंचायत सदस्य अर्जुन दुबळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
यादोगोपाळ पेठेतील मालशे पुलालगत नैसर्गिक ओढा बेकायदेशीररित्या बंदिस्त करून विकसकाला परस्पर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहेत, असा आरोप खा. उदयनराजे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत झाल्याने खासदारांनी तातडीने बैठकीनंतर मालशे पुलाची पाहणी केली. ओढ्यांचा नैसर्गिक प्रवाह अडवू नका येथील अतिक्रमणे तत्काळ काढून टाका, असे स्पष्ट आदेश खा. उदयनराजे यांनी पालिका प्रशासनाला दिले.
नांदलापुर, ता. कराड येथून इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान फोडून दोन अज्ञात चोरट्यांनी ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची तक्रार कराड पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
तळबीड, ता. कराड येथे विहिरीत बुडून एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. वसंत बाळकृष्ण यादव वय ६०, रा. तळबीड असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.
ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा ॲक्सेल तुटल्याने मंगळवारी सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास सातारा नजीक असणाऱ्या कृष्णा नदीवरील पुलावर वाहतूकीचा चांगलाच खोळंबा झाला. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन काही वेळातच वाहतूक पूर्ववत केली.