दलित वस्ती सुधार योजना या गोंडस नावाखाली समाजकल्याण विभाग मार्फत दर वर्षी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात.त्यामध्ये ठराविक धनदांडगे ठेकेदारांचे उकळ पांढरे होते पण त्या विकासकामांचा फायदा दलित समाजाला होत नाही. अशा कामांची चौकशी करावी, अशी मागणी कातर खटाव ग्रामपंचायत सदस्य अर्जुन दुबळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
सातारा : दलित वस्ती सुधार योजना या गोंडस नावाखाली समाजकल्याण विभाग मार्फत दर वर्षी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात.त्यामध्ये ठराविक धनदांडगे ठेकेदारांचे उकळ पांढरे होते पण त्या विकासकामांचा फायदा दलित समाजाला होत नाही. अशा कामांची चौकशी करावी, अशी मागणी कातर खटाव ग्रामपंचायत सदस्य अर्जुन दुबळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत माहिती अशी की खटाव तालुक्यातील विविध गावामध्ये सण २०-२१ साठी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाच्या वस्तीचा विकास करण्यासाठी ६ लक्ष ५१ हजार १८७ रुपयांची तांत्रिक मंजुरी दिली होती या मध्ये कातर खटाव मातंग वस्तीत रस्ता काँक्रीट करणे हे काम दि २० एप्रिल २१ रोजी सुरू झाले व दि २ सप्टेंबर २१ रोजी सदरचे काम पूर्ण करण्यात आले आहे. सदर रस्ता बहुसंख्येने असलेल्या मातंग वस्तीत तयार केला नसून इतर जातीसाठी लाभदायक ठरला आहे.अशी गावात चर्चा होऊ लागली आहे. मुळातच वर्क ऑर्डर देताना ज्या जागेवर काम करायचे ती जागा ग्रामपंचायतीची आहे याची खात्री करून काम सुरू करणे गरजेचे आहे. काम सुरू करण्याच्या पूर्वी दलित वस्तीच्या प्रस्तावा प्रमाणे सर्व खात्री करूनच काम सुरू करावे. या योजने अंतर्गत कोणत्याही नियमांचे उल्लंघन होऊ नये. काम सुरू होण्यापूर्वी तेथील गटविकास अधिकारी यांनी तेथील परिसरातील छाया चित्र घ्यावीत व काम पूर्ण झाल्यावर देखील त्याची छाया चित्र घ्यावीत व त्याच्या प्रति जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांच्याकडे काम पूर्णत्वाचा दाखला सहित जमा करावीत. अशी सक्त सूचना करून ही या सुचनांना बगल देऊन ग्रामसेवक व ठेकेदार यांची युतीमुळे या निधीचा अपहार झाला आहे अशा स्वरूपाची तक्रार केली आहे.
अनुसूचित जाती व बौद्ध वस्ती चा विकास करणे या साठी सुमारे ७५ गावा मध्ये प्रस्ताव मंजूर होऊन कामे ही पूर्ण झालेली आहेत.सातारा जिल्ह्याचा विचार केला असता जिल्ह्यातील खटाव, माण, खंडाळा, फलटण, सातारा, कोरेगाव, कराड ,पाटण या तालुक्यात १७० गाव मधून मागासवर्गीय वस्तीत विकास कामे झाली असून आठ तालुक्यातील गावांमध्ये ६ कोटी ६४ लाख ३८ हजार रुपये खर्च झाल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा जिल्हा परिषद यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. दरम्यान, सदर काही संशयित व निकृष्ठ विकास कामांची फेर तपासणी करून वस्तुनिष्ठ अहवाल मागासवर्गीय जनतेला देण्यात यावा. अन्यथा 'नाव मागासवर्गीयांचे आणि टक्केवारी इतरांना 'ही रूढी परंपरा खंडित करायची असेल तर इमान राखूनच कामे झाली पाहिजे ही अपेक्षा ठेवूनच कामे व्हावीत, अशी मागणी विविध संघटनेने केली आहे. अन्यथा भ्रष्ट प्रवृत्तीची नावे फलकावर लावून त्यांचा खरा चेहरा उघडकीस आणण्याचे अभिनव आंदोलन केले जाईल, त्याची सर्वश्री जबाबदारी प्रशासनाची राहील, असाही इशारा देण्यात आला आहे.
प्रतिनिधिक स्वरूपात कातरखटव गावातील मातंग वस्तीतील रस्त्याची पाहणी करून दोषी कडून सर्व विकास कामाचा निधी वसूल करावा अशीही तोंडी मागणी ग्रामपंचायत सदस्य अर्जुन भीमराव दुबळे यांनी केली आहे. निवेदनाच्या प्रति खटाव तहसीलदार, खटाव पंचायत समिती गटविकास अधिकारी, सातारा जिल्हापरिषद बांधकाम विभाग वडूज यांना देण्यात आल्या आहेत, अशीही माहिती देण्यात आली आहे.


