वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने सातारा शहरात 12 ते 20 मे 2022 या कालावधीत विशेष मोहिम राबवून वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक व्ही.एल. शेलार यांनी दिली आहे.
सातारा : वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने सातारा शहरात 12 ते 20 मे 2022 या कालावधीत विशेष मोहिम राबवून वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक व्ही.एल. शेलार यांनी दिली आहे.
या मोहिमेमध्ये बिगर वाहन परवाना धारक, वाहनांची कागदपत्रे जवळ न बाळगणारे, ट्रीपल सीट, कर्कश हॉर्न वाजूवन वाहन चालवणारे, डुप्लीकेट नंबर वापरणारे, चोरीचे मोटार वाहन, फॅन्सी नंबर प्लेट, मद्यप्राशन करुन वाहन चालवणारे, बेदरकार ड्रायव्हिंग करणारे, ब्लॅक फिल्मींग, विरुद्ध दिेशेने वाहन चालवणारे तसेच शाळा, महाविद्यालय परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे वाहन चालाकाविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये दंडात्मक कारवाई वेळ प्रसंगी गुन्हे दाखल करुन तातडजोड रक्कम वसूल कारवाई करण्यात येणार आहे, अशीही माहिती शेलार यांनी दिली.