नांदलापुर, ता. कराड येथून इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान फोडून दोन अज्ञात चोरट्यांनी ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची तक्रार कराड पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : नांदलापुर, ता. कराड येथून इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान फोडून दोन अज्ञात चोरट्यांनी ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची तक्रार कराड पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ८ रोजी २.१५ ते २.५० वाजण्याच्या सुमारास नांदलापूर गावच्या हद्दीत असणाऱ्या पाचवड फाट्यानजीक अल्फा इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाचे पाठीमागील बाजूच्या पत्र्याचे स्क्रू काढून दोन अज्ञात इसमांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातील सबमर्सिबल केबल व वायर असा एकूण 55 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची तक्रार गणेश पांडुरंग मोरे, रा. शनिवार पेठ, कराड यांनी कराड पोलीस ठाण्यात दिली आहे.