पाचवड (ता. खटाव) येथील यात्रेनिमित्त आयोजिलेल्या बैलगाडीने शर्यतीत आखलेली फाटी (ट्रॅक) पूर्ण केल्यानंतर बैलगाडी चालक खाली पडल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने बैलगाडी विहिरीत पडून दोन बैलांचा मृत्यू झाला.
एका गुन्ह्यात मदत करून त्या गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लोणंद पोलीस ठाण्यातील हवालदाराला रंगेहाथ पकडले आहे. भगवान किसन पवार असे संबंधित हवालदाराचे नाव आहे.
लोणंद पोलीस स्टेशन हद्दीतील पाडेगाव (ता . फलटण) येथील शिवंचा मळा येथे घराबाहेर झोपलेल्या तरूणाचा अज्ञातांनी निर्घृण खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. लोणंद पोलीस घटनास्थळी पोहचले असुन चौकशी सुरू केली आहे.
लोणंद- नीरा रस्त्यावर भवानीमाता मंदिरासमोरच्या उतारावर रात्री दुचाकीला इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरने पाठीमागून धडक दिल्याने बाळूपाटलाची वाडी गावचे माजी सरपंच व त्यांचा नातू ठार झाले. या घटनेमुळे बाळूपाटलाचीवाडी गावावर शोककळा पसरली. हणमंत दिनकर धायगुडे (वय ६५) व ओम विजय धायगुडे (वय १०) अशी मृतांची नावे आहेत.
कुमठे, ता. सातारा गावच्या हद्दीत घोरपडीची शिकार केल्याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या दोघांना आज न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्यांना दि.१३ मे पर्यंत म्हणजेच तीन दिवसांची वन कोठडी ठोठावली. भीमराव जयसिंग बनसोडे, रा. आरडगाव, ता. फलटण आणि अमर अशोक तरडे, रा. मलवडी, ता. फलटण अशी त्यांची नावे आहेत.
पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड नजीक तळबीड बेलवडे गावच्या हद्दीत आज सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास महामार्गालगत उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीस्वाराने पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. रोहीत रामचंद्र राऊत (वय 23),रा. शिरगांव, तालुका कराड असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
छत्रपती शाहू स्टेडियम मध्ये सिंथेटिक ट्रॅक बनवण्यासाठी अकरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणल्याबद्दल शिवसेनेचे शहराध्यक्ष निलेश मोरे यांचा रहिमतपुर मध्ये विशेष सत्कार करण्यात आला. शिवसेनेचे सातारा-सांगली संपर्कप्रमुख प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांनी मोरे यांचा शाल व बुके देऊन विशेष सत्कार केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्याखाली एकत्र येत, जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सातारा जिल्ह्यातील शेकडो महिला तसेच अन्यपक्षीय कार्यकर्त्यांनी मनसे मध्ये नुकताच जाहीर प्रवेश केला.
झाडांच्या प्रेमात पडलेल्या चौगुले कुटुंबीयांनी तन मन धनाची पर्वा न करता झपाटलेल्या ध्येयाने प्रेरित होऊन हजारो वृक्षांचे रोपण व संवर्धन केले आहे. प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्री असते असे आपण म्हणतो पण हिरवाई प्रकल्प पाहिल्यानंतर प्रा. संध्या चौगुले यांच्या मागे पांडुरंग उभा होता. त्यामुळेच हिरवाई जन्माला आली प्रा. चौगुले यांचे "हिरवाई" हे पुस्तक सर्वांना प्रेरणा देणारे आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ.दत्तप्रसाद दाभोळकर यांनी केले.
सैनिकांचा जिल्हा आणि सैनिकांचे गाव अशी ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील अपशिंगे मिलिटरी गावचे सुपुत्र जवान सुधीर सूर्यकांत निकम यांचे कर्तव्य बजावत असताना मुंबईत आज पहाटे निधन झाले. वडिलांच्या नंतर देशसेवेत असलेल्या सुधीर निकम यांच्या निधनामुळे गावात शोककळा पसरली आहे.