maharashtra

सातार्‍यात नवनिर्माणाचा धडाका

महाबळेश्‍वर तालुक्यासह जिल्ह्यातील शेकडो महिला व नागरिकांचा मनसेत पक्षप्रवेश

Innovation in Satara
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्याखाली एकत्र येत, जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सातारा जिल्ह्यातील शेकडो महिला तसेच अन्यपक्षीय कार्यकर्त्यांनी मनसे मध्ये नुकताच जाहीर प्रवेश केला.

सातारा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्याखाली एकत्र येत, जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सातारा जिल्ह्यातील शेकडो महिला तसेच अन्यपक्षीय कार्यकर्त्यांनी मनसे मध्ये नुकताच जाहीर प्रवेश केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सातारा जिल्ह्यात आवाका वाढत असून पक्ष प्रवेशाचा ओघ वाढला आहे. पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून असंख्य कार्यकर्ते पक्षात प्रवेश करू लागले आहेत.  पक्षाची ध्येय धोरणे आता समाजात रुजत चालली आहेत. सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर उतरणारा पदाधिकारी म्हणून जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांची ओळख आहे. त्याचाच परिपाक म्हणून काल महाबळेश्वर तालुक्यातील शेकडो महिलांनी व अन्य पक्षातील कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांच्या अध्यक्षतेखाली मनसे मध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी महाबळेश्वर शहरातील पक्ष कार्यालयाचे भव्य उद्घाटन युवराज पवार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. महाबळेश्वर येथील प्रमुख पर्यटन स्थळ असलेल्या वेण्णा लेक येथे मनसेच्या शाखेचे हे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हासचिव अश्विन गोळे, तालुकाध्यक्ष राजेंद्र बावळेकर, तालुकाध्यक्ष नितीन पार्टे, उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, सहकारसेनेचे अमोल गरड, शहराध्यक्ष राजेंद्र शिंदे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सौ.राणिताई शिंगरे, शहराध्यक्ष नाना कासुर्डे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते-पदाधिकारी उपस्थित होते.