maharashtra

पाडेगाव येथे घराबाहेर झोपलेल्याचा गळा चिरून खून


Murder by slitting the throat of a person sleeping outside his house in Padegaon
लोणंद पोलीस स्टेशन हद्दीतील पाडेगाव (ता . फलटण) येथील शिवंचा मळा येथे घराबाहेर झोपलेल्या तरूणाचा अज्ञातांनी निर्घृण खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. लोणंद पोलीस घटनास्थळी पोहचले असुन चौकशी सुरू केली आहे.

सातारा : लोणंद पोलीस स्टेशन हद्दीतील पाडेगाव (ता . फलटण) येथील शिवंचा मळा येथे घराबाहेर झोपलेल्या तरूणाचा अज्ञातांनी निर्घृण खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. लोणंद पोलीस घटनास्थळी पोहचले असुन चौकशी सुरू केली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, पाडेगाव (ता. फलटण) येथील पाडेगाव गावठाण पासून जवळपास दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवंचामळा येथील राहुल नारायण मोहिते (वय 31) हा तरूण आपल्या घरासमोर झोपलेला होता. यावेळी अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने गळा कापून त्‍याचा निर्घृण खून केल्याची घटना सकाळी उघडकीस आली. राहुल याच्या गळ्यावर धारदार शस्त्राने मोठा घाव घातल्याने जखम खोलवर गेल्याने मोठ्या प्रमाणावर रक्‍त स्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल के. वायकर, पीएसआय गणेश माने, स्वाती पवार, स. फौ. महेश सपकाळ, पो.कॉ.संतोष नाळे, फैय्याज शेख, अविनाश शिंदे आदी तातडीने पोहचले. गळा चिरून खून केल्याने रक्‍ताच्या थारोळ्यात राहुल मोहिते याचा मृतदेह पडल्याचे दिसून आले.