maharashtra

शिवसेना शहराध्यक्ष निलेश मोरे यांचा रहिमतपूर मध्ये सत्कार

शिवसेना नेते नितीन बानगुडे यांनी थोपटली मोरेंची पाठ

Shiv Sena city president Nilesh More felicitated in Rahimatpur
छत्रपती शाहू स्टेडियम मध्ये सिंथेटिक ट्रॅक बनवण्यासाठी अकरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणल्याबद्दल शिवसेनेचे शहराध्यक्ष निलेश मोरे यांचा रहिमतपुर मध्ये विशेष सत्कार करण्यात आला. शिवसेनेचे सातारा-सांगली संपर्कप्रमुख प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांनी मोरे यांचा शाल व बुके देऊन विशेष सत्कार केला.

सातारा : छत्रपती शाहू स्टेडियम मध्ये सिंथेटिक ट्रॅक बनवण्यासाठी अकरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणल्याबद्दल शिवसेनेचे शहराध्यक्ष निलेश मोरे यांचा रहिमतपुर मध्ये विशेष सत्कार करण्यात आला. शिवसेनेचे सातारा-सांगली संपर्कप्रमुख प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांनी मोरे यांचा शाल व बुके देऊन विशेष सत्कार केला. यावेळी दत्तात्रय नलावडे, रमेश बोराटे, उपशहरप्रमुख अभिजीत सपकाळ व गणेश अहिवळे उपस्थित होते.
बानुगडे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रहिमतपूर येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शिवसेना शहराध्यक्ष निलेश मोरे यांनी सदिच्छा भेट घेत बानुगडे पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र शिवसेनेचे शहराध्यक्षांनी केलेल्या कामगिरीची दखल बानुगडे पाटील यांनी घेतली. मोरे यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून छत्रपती शाहू स्टेडियम मध्ये सिंथेटिक ट्रॅक बनवण्यासाठी 11 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. या कामाची निविदा लवकरच सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून काढली जाणार आहे. या कामाची दखल बानुगडे पाटील यांनी घेत मोरे यांना शाबासकी दिली व त्यांचा शाल आणि बुके देऊन सत्कार केला.
सातारा पालिकेच्या नगरसेवकांनाही सत्तेचे माध्यम असताना सिंथेटिक ट्रॅक साठी निधी आणणे शक्य झाले नव्हते. मात्र निलेश मोरे यांनी एका पत्राच्या माध्यमातून सातत्याने सिंथेटिक ट्रॅक साठी नगर विकास आयुक्तांसह मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. यासंदर्भात आयोजित सहा बैठकांना निलेश मोरे यांनी सातत्याने सादरीकरण केले. कोणत्याही सत्तेशिवाय निलेश मोरे यांनी आणलेला हा निधी आणि त्या संदर्भातले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद असून सर्व शिवसेना कार्यकर्त्यांनी या पद्धतीने काम करावे, असे कौतुकोद्गार बानुगडे पाटील यांनी काढले.