maharashtra

हिरवाई प्रचंड मेहनतीतून चौगुले दाम्पत्यांनी फुलवली

डॉ.दत्तप्रसाद दाभोळकर : संध्या चौगुले यांच्या हिरवाई ग्रंथाचा लोकार्पण सोहळा उत्साहात

The greenery blossomed with great effort by the Chougule couple
झाडांच्या प्रेमात पडलेल्या चौगुले कुटुंबीयांनी तन मन धनाची पर्वा न करता झपाटलेल्या ध्येयाने प्रेरित होऊन हजारो वृक्षांचे रोपण व संवर्धन केले आहे. प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्री असते असे आपण म्हणतो पण हिरवाई प्रकल्प पाहिल्यानंतर प्रा. संध्या चौगुले यांच्या मागे पांडुरंग उभा होता. त्यामुळेच हिरवाई जन्माला आली प्रा. चौगुले यांचे "हिरवाई" हे पुस्तक सर्वांना प्रेरणा देणारे आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ.दत्तप्रसाद दाभोळकर यांनी केले.

सातारा : झाडांच्या प्रेमात पडलेल्या चौगुले कुटुंबीयांनी तन मन धनाची पर्वा न करता झपाटलेल्या ध्येयाने प्रेरित होऊन हजारो वृक्षांचे रोपण व संवर्धन केले आहे. प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्री असते असे आपण म्हणतो पण हिरवाई प्रकल्प पाहिल्यानंतर प्रा. संध्या चौगुले यांच्या मागे पांडुरंग उभा होता. त्यामुळेच हिरवाई जन्माला आली प्रा. चौगुले यांचे "हिरवाई" हे पुस्तक सर्वांना प्रेरणा देणारे आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ.दत्तप्रसाद दाभोळकर यांनी केले.
सदरबझार येथील हिरवाईच्या वनराईत पार पडलेऱ्या  हिरवाई या पुस्तकाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अरुण गोडबोले होते.
डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी सांगितले की देशात सर्वस्वाचा तथा त्याग करून राजकारणात ममता बॅनर्जी, मृणाल गोरे, मेधा पाटकर यांनी काम केलेले आहे. मात्र संध्या चौगुले यांनी स्वतः ची नोकरी, कुटुंब सांभाळून हिरवाई निर्माण केली. एवढेच नव्हे तर झाडे जगवणारी माणसे तयार केली आहेत. त्यांचे काम सर्वांचेच प्रेरणास्त्रोत आहे. एखाद्या पुस्तकाचा लोकार्पण सोहळा झाडांच्या गर्दीत व माणसांच्या उपस्थित होत असणारा पहिलाच कार्यक्रम असल्याचे दाभोळकर म्हणाले.
यावेळी अरुण गोडबोले, कॅप्टन शिवाजी यादव, सिद्धार्थ चौगुले यांची भाषणे झाली. प्रा. संध्या चौगुले यांनी जीवनातील अनुभवाचे कथन केले व अनेकदा कामातील अडचणीमुळे नैराश्य आल्याचेही सांगितले. मात्र जिद्दीने व नफा-तोट्याचा विचार न करता झाडांच्या प्रेमामुळे हजारो झाडांचे संगोपन केले. केलेल्या कामाचे मोल शब्दात सांगता येत नाही, असे संध्या चौगुले म्हणाल्या. शिरीष चिटणीस यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमास नरेंद्र पवार, अरविंद करांडे, डॉक्टर संजय पुजारी, शशिकला राऊत, डॉक्टर सुनील यादव, राजेंद्र राजपूत, समीर मोहिते, महेश कोकीळ, दीपक फुले, बाळासाहेब तनपुरे, प्राध्यापक साहेबराव होळ, शर्वरी पाटणे, किरण येवले उपस्थित होते. शिर्के यांनी सूत्रसंचालन केले तर तानाजी मस्के यांनी आभार मानले.