maharashtra

कुमठे गावच्या हद्दीत घोरपडीची शिकार केल्याप्रकरणी दोघांना तीन दिवसांची वन कोठडी


Two days imprisonment for hunting
कुमठे, ता. सातारा गावच्या हद्दीत घोरपडीची शिकार केल्याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या दोघांना आज न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्यांना दि.१३ मे पर्यंत म्हणजेच तीन दिवसांची वन कोठडी ठोठावली. भीमराव जयसिंग बनसोडे, रा. आरडगाव, ता. फलटण आणि अमर अशोक तरडे, रा. मलवडी, ता. फलटण अशी त्यांची नावे आहेत.

सातारा : कुमठे, ता. सातारा गावच्या हद्दीत घोरपडीची शिकार केल्याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या दोघांना आज न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्यांना दि.१३ मे पर्यंत म्हणजेच तीन दिवसांची वन कोठडी ठोठावली. भीमराव जयसिंग बनसोडे, रा. आरडगाव, ता. फलटण आणि अमर अशोक तरडे, रा. मलवडी, ता. फलटण अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत वन विभागाने दिलेली माहिती अशी, दि. १ मे रोजी कुमठे, ता. सातारा गावच्या हद्दीत रस्त्यावरून दोन इसम घोरपडीची शिकार करून घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे तात्काळ वन विभागाचे कर्मचारी कुमठेच्या दिशेने रवाना झाले. रस्त्यावरून चालत येणारे दोन इसम निदर्शनास आल्यानंतर त्यांना थांबवून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आपली नावे भीमराव जयसिंग बनसोडे आणि अमर अशोक तरडे अशी सांगितली. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे एक मृत घोरपड आढळून आली. दोघांनाही ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी सांगितले, कुमठे गावच्या हद्दीत दत्तात्रय अर्जुन चव्हाण यांच्या उसाच्या शेतात गावठी कुत्र्यांच्या मदतीने आणि काठी व कुर्‍हाडीच्या सहाय्याने घोरपडीची शिकार केली. त्यांनी शिकारीची कबुली दिल्यानंतर त्यांना आज सातारा येथील न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने त्यांना दि. १३ मे पर्यंत वन कोठडी ठोठावली.
ही कारवाई उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनावले, वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण, वनपाल अरुण सोळंकी, कुशल पावरा, वनरक्षक महेश सोनावले, सुहास भोसले, राजकुमार मोसलगी, साधना राठोड, अश्विनी नरळे, मारुती माने यांनी केली.