maharashtra

तळबीड येथे विहिरीत बुडून एकाचा मृत्यू


One died after drowning in a well at Talbeed
तळबीड, ता. कराड येथे विहिरीत बुडून एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. वसंत बाळकृष्ण यादव वय ६०, रा. तळबीड असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.

सातारा : तळबीड, ता. कराड येथे विहिरीत बुडून एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. वसंत बाळकृष्ण यादव वय ६०, रा. तळबीड असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ८ रोजी वसंत यादव हे ४.३० वाजण्याच्या दरम्यान फिरायला गेले होते. मात्र बराच वेळ झाला तरी ते घरी परत न आल्याने त्यांचे नातेवाईक त्यांचा शोध घेत असताना तळबीड गावच्या हद्दीत एका विहिरीवर त्यांची चप्पल व पाण्याची बाटली आढळून आली. विहीरीत पाहिले असता त्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याची खबर योगेश प्रकाश गायकवाड यांनी तळबीड पोलीस ठाण्यात दिली आहे.