पुणे शहरात महिला फौजदार म्हणून कर्तव्य बजावत असलेल्या प्रियांका निकम यांनी पतीसह एकूण ६ जणांवर जाचहट, फसवणूक व गळा दाबल्याप्रकरणी तक्रार दिली आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस अधिकार्याच्या या तक्रारीने खळबळ उडाली आहे.
सातारा : पुणे शहरात महिला फौजदार म्हणून कर्तव्य बजावत असलेल्या प्रियांका निकम यांनी पतीसह एकूण ६ जणांवर जाचहट, फसवणूक व गळा दाबल्याप्रकरणी तक्रार दिली आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस अधिकार्याच्या या तक्रारीने खळबळ उडाली आहे.
पती प्रशांत शिवाजी शिंदे, सासू मंगल शिंदे (दोघे रा. चिंचणी ता. सातारा), नणंद हेमा भोसले, गणेश भोसले (दोघे रा. सैदापर ता. सातारा), नणंद दिपाली जाधव, गणेश जाधव (दोघे रा.पिंपरी, पुणे) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी प्रियांका सत्यवान निकम (वय ३१, सध्या रा. कोंढवा, पुणे, मूळ रा. करंदी ता. जावली जि. सातारा) यांनी तक्रार दिलेली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, संशयित आरोपी सर्वांनी तक्रारदार यांना मानसिक, शारीरिक त्रास देवून छळ केला. २०१४ व २०१९ मध्ये पतीसह सासू व नणंद हेमा यांनी तक्रारदार प्रियांका यांच्या इच्छेविरुध्द जबरदस्तीने गर्भपात केला. तसेच दोन्ही नणंदांनी मारहाण करत एकदा गळा दाबला.
दरम्यान, सुरुवातीला पतीने विश्वास संपादन करुन ‘तुझ्या नावावर जमीन घेवू. बँकेतून 8,20,000 रुपयांचे वैयक्तिक कर्ज काढायला लावले. तसेच 15 महिन्यांचा पगार असे 10 लाख रुपये दोघांच्या खात्यावर घेवून जमीन मात्र सासूच्या नावावर घेवून फसवणूक केली, ’ असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल केला.