maharashtra

बुध येथे कांद्याची एैरण जळून खाक, सुमारे लाखाचे नुकसान


Burning of onion at Budh
बुध (करंजओढा), ता. खटाव गावच्या हद्दीत चावर नावाच्या शिवारात अरविंद शंकर बोराटे (वय ५५, रा बुध [करंजओढा]) यांच्या शिवारातील दोन कांदयाच्या ऐरणीस रात्री लागलेल्या आगीत कांद्याची ऐरण जळून खाक झाली.

पुसेगाव : बुध (करंजओढा), ता. खटाव गावच्या हद्दीत चावर नावाच्या शिवारात अरविंद शंकर बोराटे (वय ५५, रा बुध [करंजओढा]) यांच्या शिवारातील दोन कांदयाच्या ऐरणीस रात्री लागलेल्या आगीत कांद्याची ऐरण जळून खाक झाली.
या आगीत अंदाजे १ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची फिर्याद अरविंद बोराटे यांनी पुसेगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. आगीचे कारण समजू शकले नाही. पोलीस हवालदार दिपक बर्गे अधिक तपास करीत आहेत.