जिहे, ता. सातारा गावच्या हद्दीत जुगार अड्ड्यावर छापा पोलिसांनी ६ हजार ३२५ रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.
सातारा - मेढा मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाल्याची घटना घडली.
रहिमतपूर - कोडोली मार्गावर ओमीनी कार आणि रिक्षाची धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना घडली.
येथील बसस्थानक परिसरात एकाला मारहाण झाल्याने त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरोडय़ाचा तयारीत असणाऱ्या टोळीकडुन लोणंद पोलीसांनी फलटण व बारामती तालुक्यातील विहीरीवरील इलेक्ट्रीक मोटार चोरीचे ९ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ पुणे आणि लोकमंगल ग्रुप शिक्षणसंस्था सातारा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाहूपुरी शाखा (सातारा) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 18 आणि रविवार दिनांक 19 जून 2022 असे दोन दिवसीय तिस-या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनाचे आयोजन सातारा येथे करण्यात आले आहे.
वरकुटे-मलवडी ता. माण येथे बांधण्यात आलेल्या तुटका खडा तलावातील अधिग्रहित जमिनीचा 8 कोटी रुपयांचा मोबदला न दिल्यास कृष्णानगर सातारा येथील जलसंधारण अधिकारी सतीश लब्बा यांना येत्या 27 जून रोजी गोमूत्राने अभिषेक घालण्यात येणार आहे. तरीही गांभीर्याने न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषण करणार असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र् प्रदेश सरचिटणीस अभयशिंह जगताप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सरकारच्या उदासिनतेमुळे मातंग, मोची, होलार, चांभार, ढोर व धनगर समाज विकासापासून दूर आहे. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने कृतीशील आराखडा उभारावा, अशी मागणी माजी मंत्री व बहुजन विकास परिषद (महाराष्ट्र)चे संस्थापक अध्यक्ष प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी केली.
पावसाचे पहिले रोहिणी नक्षत्र संपून आता चांगल्या पावसाचे समजले जाणारे मृग नक्षत्र सुरु होवून नऊ दिवसांचा कालावधी लोटला. तरी पण अद्याप बुध परिसरात दमदार पाऊस पडला नाही. पावसाअभावी पेरणीला विलंब होत असल्याने शेतकऱ्यांचे डोळे अभाळाकडे लागले आहेत.
सातारा तालुक्यातील वेणेगाव गावच्या हद्दीत असणाऱ्या बंद घरात घरफोडी करुन दोघांनी ३ लाख १६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. याबाबतची तक्रार बोरगाव पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.