शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.१५ जुन रोजी १२ वाजण्याच्या सुमारास सातारा येथील लक्ष्मी टेकडी परिसरात असणाऱ्या पाण्याच्या टाकी जवळ तेथीलच आदित्य दीपक कुचेकर, वय २३ यांनी आपल्या बहिणीच्या मुलाला जवळ घेतल्याच्या कारणावरून रोहित संजय देवकुळे, संगीता देवकुळे दोन्ही रा. लक्ष्मी टेकडी सातारा यांनी त्याला शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी दोघांच्या वरही शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


