maharashtra

लोणंद पोलीसांकडून विहिरीवरील मोटारी चोरणाऱ्या पाच जणांच्या टोळीचा पर्दाफाश

९ गुन्हे उघडकीस आणून १ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल केला हस्तगत

Lonand police expose a gang of five people who stole a car from a well
दरोडय़ाचा तयारीत असणाऱ्या टोळीकडुन लोणंद पोलीसांनी फलटण व बारामती तालुक्यातील विहीरीवरील इलेक्ट्रीक मोटार चोरीचे ९ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

सातारा : दरोडय़ाचा तयारीत असणाऱ्या टोळीकडुन लोणंद पोलीसांनी फलटण व बारामती तालुक्यातील विहीरीवरील इलेक्ट्रीक मोटार चोरीचे ९ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
दिनांक १० जुन रोजी लोणंद पोलीसांचे रात्रगस्तीचे पथक हे गस्त घालीत असताना पाडेगांव येथील नेवसेवस्ती ता. फलटण गांवाचे हद्दीत दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या पाच इसमांना त्यांच्याकडील हत्यारासह ताब्यात घेवून त्यांच्याकडे सखोल तपास करुन लोणंद, तसेच फलटण व बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विहीरीवरील चोरी केलेल्या इलेक्ट्रीक मोटारी, एक HTP पंप व पाण्याचे वॉल, असे एकुण 1,54,000 रुपये मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन आरोपींच्याकडुन लोणंद पोलीस स्टेशन हद्दीतील पाच, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील दोन व वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील दोन असे एकुण नऊ गुन्हे उघडकिस आणले आहेत.
सदर प्रकरणात महंमद अल्ली रमजान अल्ली वय 32 रा. परसा स्टेशन ता. सोरतगढ जि सिध्दार्थनगर उत्तरप्रदेश सध्या रा. बाळुपाटलाची वाडी ता.खंडाळा, महमंद इम्रान अब्दुल मोहीद, वय 37 रा. रोमनदेही. सोरतगढ जि.सिध्दार्थनगर उत्तरप्रदेश सध्या रा.बाळुपाटलाची वाडी ता. खंडाळा, शिवा संत भगवानदास कनोजिया वय 35 वर्षे, रा. डुबरी ता.तुलसीपुर जि. बलरामपुर उत्तरप्रदेश, फकरुऊद्दीन बहादुर खान वय 20 रा. पिपरा जि.बलरामपुर उत्तरप्रदेश, आलम सऊद खान वय 42 रा. रोमनदेही ता सोरतगढ जि.सिध्दार्थनगर उत्तरप्रदेश सध्या रा.बाळुपाटलाची वाडी ता.खंडाळा अशा पाच जणांना अटक करण्यात आले असून त्यांनी ९ गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
सदर गुन्ह्याचा तपास अजयकुमार बन्सल, पोलीस अधिक्षक सातारा, अजित बोऱ्हाडे अपर पोलीस अधीक्षक, सातारा तानाजी बरडे उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल के. वायकर,पोलिस उपनिरिक्षक गणेश माने, सहा फौजदार महेश सपकाळ, विष्णु धुमाळ, कय्युम मुल्ला, पोहवा अविनाश नलवडे, संतोष नाळे, अतुल कुंभार, श्रीनाथ कदम, विठ्ठल काळे, सर्जेराव सुळ, सिध्देश्वर वाघमोडे, बापुराव मदने, अभिजीत घनवट, अविनाश शिंदे, फैयाज शेख, गोविंद आंधळे, कापडगांवचे पोलीस पाटील नंदकुमार खताळ तसेच मिरेवाडी गांवचे पोलीस पाटील पंढरीनाथ नरुटे यांनी सदर कारवाई मध्ये सहभाग घेतला.