सातारा - मेढा मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाल्याची घटना घडली.
सातारा : सातारा - मेढा मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ध्रुर्व गणेश घागरे रा. आकले, तालुका सातारा हा सचिन राजाराम पवार यांच्यासमवेत दुचाकीवरून शाहूपुरी ते आकले जात असताना सातारा मेढा मार्गावर यश ढाब्याजवळ त्यांच्या दुचाकीची दुसऱ्या दुचाकी बरोबर धडक झाल्याने त्यात तो आणि सचिन राजाराम पवार हे दोघे जखमी झाले. त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


