सातारा शहर व परिसरातून दोन जण बेपत्ता झाल्याची तक्रार संबंधित पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा जिल्ह्याचे मिनी मंत्रालय ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेची अंतिम प्रभाग रचना 27 जून रोजी जाहीर होणार आहे. यासंदर्भात दाखल झालेल्या शंभर हरकतींची सुनावणी पुणे येथे विभागीय आयुक्त कार्यालयात नुकतीच पार पडली. त्यामुळे विभागीय आयुक्तांच्या निर्णयाकडे राजकीय पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील ५४ गावांना पिण्यासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी बोंडारवाडी येथे धरण बांधण्यास आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले.
आस्था बेघर निवारा केंद्रातर्फे वटपौर्णिमेच्या निमित्ताने अजिंक्यतारा पठार परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
देहू येथील लोकार्पण सोहळ्याच्या प्रसंगी भाजपने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाषण होऊ दिले नाही, या प्रकरणाचा राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने बुधवारी निषेध करण्यात आला. या निषेधाचे निवेदन अतिरिक्त जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख यांना सादर करण्यात आले.
तब्बल दोन वर्षाच्या कोरोना च्या कालखंडानंतर बुधवारी सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांनी गजबजल्या. शाळेच्या पहिल्या दिवशी सुमारे जिल्ह्यात ठिकाणी उपस्थिती दर्शवून शाळेचा पहिला दिवसाचा आनंद विद्यार्थ्यांनी द्विगुणित केला. शाळेत गुरुजनांनी विद्यार्थ्यांचे पुष्प आणि गोड खाऊ देऊन स्वागत केले.
सातारा जिल्ह्यातील घेतलेल्या आढावा बैठकीत ठरल्यानुसार आज माणदेशी फाउंडेशनने या महिलांना विनामूल्य बियाणे देण्याचा घेतलेला कार्यक्रम हा या महिलांचा माणुसकीवरील विश्वास अधिक दृढ करणार आहे, असे मत आज विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
सातारा तालुक्यातील राजकारणाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू असणाऱ्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. सहकार विभागाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 21 जागांसाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. कारखान्यासाठी 17 जुलै रोजी मतदान होणार असून 19 जुलैला मतमोजणी होणार आहे.
सातारा बिझनेस सेंटर समोर गाडीची मागील काच फोडून अज्ञाताने दहा हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरल्याची घटना दिनांक 26 मे 2022 रोजी घडली आहे.
माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू-सासरे यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विवाहिता सोनाली सयाजी केंडे यांनी फिर्याद दिली आहे.