maharashtra

सातारा जिल्हा परिषदेची अंतिम प्रभाग रचना 27 जून रोजी

पुणे येथे शंभर हरकतींची सुनावणी प्रक्रिया पूर्ण

Final ward formation of Satara Zilla Parishad on 27th June
सातारा जिल्ह्याचे मिनी मंत्रालय ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेची अंतिम प्रभाग रचना 27 जून रोजी जाहीर होणार आहे. यासंदर्भात दाखल झालेल्या शंभर हरकतींची सुनावणी पुणे येथे विभागीय आयुक्त कार्यालयात नुकतीच पार पडली. त्यामुळे विभागीय आयुक्तांच्या निर्णयाकडे राजकीय पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

सातारा : सातारा जिल्ह्याचे मिनी मंत्रालय ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेची अंतिम प्रभाग रचना 27 जून रोजी जाहीर होणार आहे. यासंदर्भात दाखल झालेल्या शंभर हरकतींची सुनावणी पुणे येथे विभागीय आयुक्त कार्यालयात नुकतीच पार पडली. त्यामुळे विभागीय आयुक्तांच्या निर्णयाकडे राजकीय पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद गट व गणाच्या प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने विभागीय आयुक्तांकडे सादर केला होता. या आराखड्यावर आयुक्त स्थळावर कामकाज पूर्ण करण्यात आले. जिल्हा परिषद व पंचायत समिती गणांची तपासणी करताना भौगोलिक सर गावे लोकसंख्या पाहण्यात आले आहे. त्यानंतर 31 मे रोजी विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या प्रारूप प्रभाग रचना आराखड्याला मान्यता दिली. त्यामुळे दोन जून रोजी प्रारूप प्रभाग रचना अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. या प्रभाग रचनेवर दिनांक आठ जून पर्यंत हरकती मागविण्यात आल्या होत्या. यानुसार जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांसाठी खंडाळा तालुक्यातून 11, फलटण पाच, खटाव 11, कोरेगाव एक, वाई 21, जावली-सातारा 20, पाटण-कराड 21 अशा 100 हरकती दाखल झाल्या. माण व महाबळेश्‍वर तालुक्‍यात एकही हरकत दाखल झाली नाही. या हरकतींवर सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालय सुनावणी पार पडली. एकाच दिवसात या सर्व हरकतींवर सुनावणी पूर्ण करण्यात आल्या. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी यात किती हरकती फेटाळल्या आणि किती हरकतींवर निर्णय देऊन गण बदलण्यात आले, हे लवकरच कळणार आहे. विभागीय आयुक्तांच्या निर्णयाकडे जिल्ह्यातील इच्छुक पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
विभागीय आयुक्त हे प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन निवडणूक विभाग निर्वाचक गण रचना अंतिम 22 जून पर्यंत निर्णय देणार आहेत. त्यानंतर 27 जून रोजी जिल्हाधिकारी अंतिम प्रभाग रचना जाहीर करणार असल्याने विभागीय आयुक्त हे प्राप्त झालेल्या सूचनांवर सुनावणी घेऊन निवडणूक विभाग निर्वाचक गण रचना अंतिम 22 जून पर्यंत निर्णय देणार आहेत. त्यानंतर 27 जून रोजी जिल्हाधिकारी अंतिम प्रभाग रचना जाहीर करून राजपत्रात प्रसिद्ध करणार आहेत. 27 जून रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी कळविले आहे.