maharashtra

सातारा बिझनेस सेंटर समोर गाडीची काच फोडून लॅपटॉप चोरला


broke the car window in front of Satara Business Center and stole a laptop
सातारा बिझनेस सेंटर समोर गाडीची मागील काच फोडून अज्ञाताने दहा हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरल्याची घटना दिनांक 26 मे 2022 रोजी घडली आहे.

सातारा : सातारा बिझनेस सेंटर समोर गाडीची मागील काच फोडून अज्ञाताने दहा हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरल्याची घटना दिनांक 26 मे 2022 रोजी घडली आहे. याप्रकरणी सतीश बाळासो होळकर वय 38 राहणार होळ तालुका बारामती जिल्हा पुणे यांनी शाहूपुरी पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे.
26 मे रोजी होळ काही कामानिमित्त साताऱ्यात आले होते. त्यांनी त्यांची गाडी सातारा बिजनेस सेंटर समोर लोक करून पार्किंगमध्ये उभी केली होती. तेव्हा अज्ञाताने गाडीच्या मागच्या बाजूने काच फोडून आतील दहा हजार रुपये किमतीचा डेल लॅपटॉप चोरून नेला. हवालदार एस. एस. जाधव अधिक तपास करत आहेत.