आस्था बेघर निवारा केंद्रातर्फे वटपौर्णिमेच्या निमित्ताने अजिंक्यतारा पठार परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
सातारा : आस्था बेघर निवारा केंद्रातर्फे वटपौर्णिमेच्या निमित्ताने अजिंक्यतारा पठार परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
वटपौर्णिमेचे औचित्य साधून आणि पर्यावरणाचा उदात्त हेतू मनात ठेवून आस्था बेघर निवारा केंद्रातर्फे अजिंक्यतारा पठार परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम गुरुनाथ चॅरिटेबल ट्रस्ट तसेच सातारा नगरपालिका सातारा, इनरव्हील क्लब सातारा या सर्वांच्या सहकार्याने करण्यात आला. आजच्या घडीला वृक्षारोपणाचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. वृक्षारोपणाबरोबरच वृक्षांचे जतन करण्याचीही भावना मनात ठेवून वटपौर्णिमेला एक नवीन संकल्प म्हणून वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी एनयुएलएम च्या सौ.कीर्ती साळुंखे, दिवेकर, सौ. आरती जोशी, वृक्ष विभागाचे प्रणव पवार, आस्था बेघर निवारा केंद्राचे व्यवस्थापक शिवम इंगळे, गुरुनाथ चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष कौशिक कुलकर्णी व अभिषेक कुलकर्णी, इनरव्हील क्लब चे सदस्य तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
वृक्षांचे महत्व जाणता अजिंक्यतारा पायथा परिसरावर विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. भविष्यात जर वडाची झाडेच शिल्लक नसतील तर वटपौर्णिमेला कशा फेर्या मारणार? म्हणून जर आजच या वटवृक्षाची संख्या झाडांची संख्या वाढवली तर निसर्गाच्या या मायेच्या उबेत आपल्याला राहता येईल. म्हणून एक नवीन संकल्पना घेऊन हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरवले होते, असे याप्रसंगी विविध मान्यवरांनी सांगितले. पठारावरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिवम इंगळे यांनी केले.
यावेळी सुरज म्हस्के, अजय अडागळे, संगीता झंवर, संगीता लोया, लीना कदम, वैशाली पाटील, अनिता नागोरी, लता इंगळे, विष्णू इंगळे, रणदिवे, संतोष कांबळे, आकाश आवळे, अंजना घाडगे, रेशमा ताई आणि आस्था परिवाराचे सर्व सदस्य उपस्थित होते.


