एकास मारहाण केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
राहत्या घरातून एक युवती बेपत्ता झाल्याची खबर भुईंज पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
वाई-पाचगणी रस्त्यावर गांधी पेट्रोल पंपाजवळ डंपरने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जेष्ठ नागरिक जागीच ठार झाले, तर त्यांची दोन नातवंडे गंभीर जखमी झाली. शनिवारी दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला.
मागील आठवड्यात भरतगाव (ता सातारा) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दोन महिला शिक्षिकांमध्ये मारामारी झाली होती. दोन्ही महिला शिक्षकांनी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारीही दाखल केल्या आहेत. या दोन्ही शिक्षिकांचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी निलंबन केले आहे.
मिरज-पुणे रेल्वे मार्गावर लोणंद रेल्वे स्टेशन नजीक असलेल्या फलटण रेल्वे पुलाखाली रेल्वेच्या धडकेत तरडगाव येथील एका युवकाचा मृत्यु झाला.
संवाद यात्रेच्या निमित्ताने फलटण तालुक्यातील लोकांच्या समस्या, अडचणी व त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर व भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांनी फलटण तालुक्यातील पंचायत समिती गण निहाय दौऱ्याच्या निमित्ताने राजुरी येथे आयोजित कार्यक्रमात लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या.
विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी या योजनेंतर्गत येत असलेल्या कामांबाबत उद्घाटनांचा सपाटा लावला असून आम्ही करीत असलेल्या विकासकामांचे फुकाचे श्रेय लाटण्याचा याद्वारे प्रयत्न सुरु असल्याचा आरोप खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सातारा येथे केला.
सातारा जिल्हा अधिकारी कार्यालय ही शासकीय जागा आहे. या परिसरात एक अनधिकृत थडगे असून त्याचे वारंवार उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे वेगळा पायंडा पडत असून काही अवैध प्रकारांना येथे खतपाणी मिळत आहे. त्यामुळे हे अतिक्रमण तात्काळ काढावे, अशी मागणी हिंदू एकता आंदोलन समितीचे अध्यक्ष व महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्यकारिणीचे सचिव विक्रम पावसकर यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याकडे केली आहे.
बनावट प्लायवूड विक्री केल्याप्रकरणी चौधरवाडी, ता. फलटण येथील अमोल विलास चौधरी (वय 34) या व्यापार्याविरोधात कॉपीराईट अधिनियमानुसार फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीस रेकार्डवरील तडीपार केलेल्या गुन्हेगारांकडून दोन गावठी पिस्टल, दोन जिवंत राऊंड व 1 मोटार सायकल जप्त करून त्याला अटक करण्यास आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली. त्याच्याकडून 1 लाख 70 हजार 400 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.