ग्राहकाच्या ठेव पावत्यांचा अपहार केल्याप्रकरणी डीसीबी बँकेने ग्राहकास दंडासह नुकसानभरपाई देण्याचे जिल्हा ग्राहक आयोगाने आदेश दिले आहेत.
सातारा : ग्राहकाच्या ठेव पावत्यांचा अपहार केल्याप्रकरणी डीसीबी बँकेने ग्राहकास दंडासह नुकसानभरपाई देण्याचे जिल्हा ग्राहक आयोगाने आदेश दिले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शाहूनगर, सातारा येथील नितीन बाजीराव म्हस्के यांनी 008 वँकेच्या सातारा शाखेमध्ये वेगवेगळ्या ठेव पावत्यान्वये एकूण रक्कम रु. 17,00,000/- ठेव ठेवलेली होती. डीसीबी बँकेचा सातारा शाखेचा तत्कालीन शाखा व्यवस्थापक आनंद अरविंद आरळकर याने कोरोनाच्या पहिल्या लाटेत मे 2020 मध्ये तक्रारदार म्हस्के यांची कोणत्याही प्रकारची संमती न घेता परस्पर ठेव पावत्या मोडून, त्या ठेव पावत्यांच्यावर कर्ज खाते काढून, ठेव पावत्यांची मोडलेली रक्कम रु. 14,92,000 एवढी रक्कम डीसीबी खात्यावरून तिर्हाईत व्यक्ती वैभव विजय देशमुख यांच्या खात्यावर पाठवून, त्यानंतर सदरची रक्कम वैभव विजय देशमुख यांचेकडून आनंद आरळकर याने स्वतःच्या व त्याचे पत्नीच्या खात्यावर ट्रान्स्फर करून घेऊन, तक्रारदार नितीन म्हस्के यांचे ठेव रकमेचा त्यांच्या संमतीशिवाय अपहार केलेला होता. तक्रारदार ग्राहक म्हस्के यांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी तत्काळ बँकेच्या सातारा शाखेकडे तसेच बँकेच्या मुख्य व्यवस्थापनाकडे त्यावावत चौकशी केली असता, बँकेने त्यांना कोणतीही माहिती दिली नाही. तसेच म्हस्के यांनी वादातील व्यवहाराचे कागदपत्रांची लेखी मागणी करूनही बँकेने त्यांना कोणतीही कागदपत्रे दिली नाहीत अगर कोणतीही माहिती दिली नाही.
वँक व बँकेचे व्यवस्थापन तक्रारदार ग्राहक नितीन म्हस्के यांना कोणतीही माहिती देत नसल्याची खात्री झाल्यानंतर तक्रारदार यांनी अँड आनंद कदम यांच्यामार्फत मा. जिल्हा ग्राहक तक्रार आयोग सातारा यांचेकडे ठेव पावत्यातील रकमा व्याजासह मिळण्यासाठी तसेच आनंद आरळकर याने तक्रारदार म्हस्के यांच्या बनावट सह्या करून काढलेले कर्ज खाते बंद करून मिळण्यासाठी तसेच नुकसानभरपाई मिळणेसाठी तक्रार अर्ज दिलेला होता. या तक्रार अर्जास बँकेने व तत्कालीन शाखा व्यवस्थापक आनंद आरळकर यांनी जोरदार आक्षेप घेऊन तक्रारदार म्हस्के यांच्या ठेव पावत्या रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार मोडून व त्यांच्या मागणीनुसारच ओ डी कर्ज खाते काढून तशी रक्कम वैभव विजय देशमुख यांना ट्रान्स्फर केली असल्याचा, तसेच तक्रारदार हे स्वतः वकील असल्याने त्यांना कायद्याची व बँकिंग प्रणालीची माहिती असल्याने तक्रारदार यांनीच ठेव पावत्या मोडून त्यावर कर्ज घेवून कर्ज बुडविण्याच्या हेतूने खोटी तक्रार केली आहे, असा दांडगा वचाव घेतलेला होता.
तथापि तक्रारदार ग्राहक म्हस्के यांचे वकील आनंद कदम यांनी वँकेच्या व्यवस्थापनाने ठेव पावत्या मुदतपूर्व मोडायची नियमावली, ओ डी खाते काढायची नियमावली तसेच ओ डी खात्यावरून रक्कम तिर्हाईत व्यक्तीस पाठविण्याची कोणतीही रिझर्व्ह बँकेची नियमावली तक्रारदार यांना दिलेली नाही. तसेच कोणत्याही बँकिग नियमांचे पालन आनंद आरळकर याने केलेले नव्हते. वादातील व्यवहार करताना 2198 फॉर्मवरील हस्ताक्षर व सही म्हस्के यांची नसल्याचे, तसेच रक्कम रु. 14,92,000/- एवढी मोठी रक्कम आरटीजीएस ने ट्रान्स्फर करताना बँकेने चेकचा वापर न करता अगर कोणत्याही बँकिंग चलनाचा वापर न करता रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे उल्लंघन केले असल्याचा युक्तिवाद ऍड. आनंद आर. कदम यांनी ग्राहक आयोगाचे समोर करून तसे निदर्शनास आणून दिले. तसेच प्रथमदर्शनी तत्कालीन शाखा व्यवस्थापक आनंद आरळकर याने म्हस्के यांच्या ठेव रकमेचा प्रथमदर्शनी अपहार केल्याचे दिसत असूनही बँकेच्या मुख्य व्यवस्थापनाने व संचालक मंडळाने आनंद आरळकर यांच्यावर कोणतीही खातेनिहाय चौकशी न केल्याने ग्राहक आयोगाने बँकेच्या मुख्य व्यवस्थापनास फटकारले असून, आनंद आरळकर याने केलेल्या अपहाराबाबत बँकेच्या संचालक मंडळास देखील ग्राहक आयोगाने जबाबदार धरलेले आहे.
तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पुराव्यावरून, बँकेने दाखल केलेल्या बनावट कागद पत्रावरून आयोगाने डीसीबी बँक, बँकेचे संचालक व सातारा शाखेचा तत्कालीन शाखा व्यवस्थापक आनंद आरळकर यास वैयक्तिक व संयुक्तिकरित्या जबाबदार धरून, बँकेचे संचालक मंडळ व आनंद आरळकर यांनी तक्रारदार यांना त्यांची ठेव रक्कम रु. 18,61,551/- एवढी रक्कम 7.50 टक्के व्याजासह 45 दिवसात परत देण्याचे, तसेच ओ डी खात्याची सिबिल रेकॉर्डला नोंद रद्द करून देण्याचे देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तक्रारदार यांना झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी स्क्कषम रु. 55000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 10,000/- देण्याचे आदेश मा. जिल्हा ग्राहक आयोगाचे अध्यक्ष मिलिंद पवार (हिरुगडे), सदस्य राहुल पाटील व सदस्य दिनेश गवळी यांनी नुकतेच दिले.
या निकालाने बँकेच्या मनमानी कारभारास आळा बसणार आहे. तक्रारदार नितीन म्हस्के यांचे वतीने अँड आनंद कदम यांनी काम पहिले व त्यांना अँड. हाजरा सय्यद यांनी सहकार्य केले. तसेच डीसीबी बँकेने रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे पालन केले नसल्याने डीसीबी बँकेची रिझर्व्ह बँकेकडे लेखी तक्रार करणार असल्याची माहितीदेखील अँड. आनंद कदम यांनी दिली आहे.


