सदरबझार येथून चोरी केलेल्या मोटर सायकल चोरटय़ास अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. चोरीचा गुन्हा दाखल होताच अवघ्या एक तासात या आरोपीला जेरबंद केले आहे.
नांदवळ (ता. कोरेगाव) येथे शेतकऱयाच्या खूनप्रकरणी महिलेस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. सीमा नामदेव चव्हाण (वय 30, रा. नांदवळ, ता. कोरेगाव) असे महिलेचे नाव आहे. अनैतिक संबंधातून होणाऱया वादावादीतून महिलेने शैलेश अशोक भोईटे (रा. वाघोली, ता. कोरेगाव) यांचा खून केला होता.
इस्माईल मुल्ला लॉ कॉलेज समोरून पायी चालत निघालेल्या महिलेचे मंगळसुत्र धूम स्टाईलने दोन इसमांनी चोरून पसार झाले. ही दोन दिवसांतील ही दुसरी घटना आहे. अशीच घटना पिरवाडी परिसरात घडली. यामुळे महिलांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोरटय़ांना जेरबंद करण्याची मागणी जोर धरत आहे.
सदरबझार येथे राहत असलेल्या जावयाला त्याच्या वडिलांच्या घरी जाऊन सासु-सासरे, मेव्हणा व पत्नीने मारहाण केल्याची तक्रार पतीने शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. अमितकुमार राजेंद्र फरांदे(वय 30) असे त्याचे नाव आहे.
सातारा तालुक्यातील खेड येथील एक काँक्रिटीकरणं रस्ता कागदावर झाला आहे, तर बोरखळ येथील झालेल्या रस्त्याच्या निधीचा पत्ताच नाही. ही दोन्ही गावांचा कोरेगाव विधानसभा मतदार संघात समाविष्ट होत असून या रस्त्यांचे नक्की गौडबंगाल काय आहे?
पोलीस असल्याची बतावणी करून एका दाम्पत्याचे सुमारे 68 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने दोन अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याबाबतची फिर्याद वडूज पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
एका अल्पवयीन मुलीची आर्थिक फसवणूक करण्यासह तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
साताऱ्यात चेन स्नॅचिंगची घटना घडली असून चोरट्यांनी महिलेचे गंठण हिसकावून पोबारा केला आहे.
जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन जण बेपत्ता झाल्याच्या घटना संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या जागेत ई-बस साठी चार्जिंग स्टेशन उभारण्यास शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज जोरदार विरोध करत तीव्र निदर्शने केली. एसटी महामंडळ व जिल्हा प्रशासनाचा यावेळी निषेध नोंदवण्यात आला. हे चार्जिंग स्टेशन महामंडळाच्या जागीच करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.