एकास मारहाण केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता सुमारास रविराज गुणवंत जाधव वय 19 राहणार खिंडवाडी तालुका सातारा हा सातारा पॉलिटेक्निक कॉलेज येथील कॉम्प्युटर क्लासमध्ये मित्रांसोबत गप्पा मारत बसलेला असताना नयन शशिकांत मोरे रा. आसनगाव ता. सातारा याने तेथे येऊन रविराज याला तू बेंच वाजवू नको, असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी केली. तसेच लाकडी इलेक्ट्रिक चा बोर्ड रविराज याच्या डोक्यात मारून त्याला जखमी केले. याबाबतची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक महांगडे करीत आहेत.