maharashtra

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील थडगे हटवा, अन्यथा आंदोलन

विक्रम पावस्कर यांनी प्रशासनाला दिला आंदोलनाचा इशारा

सातारा जिल्हा अधिकारी कार्यालय ही शासकीय जागा आहे. या परिसरात एक अनधिकृत थडगे असून त्याचे वारंवार उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे वेगळा पायंडा पडत असून काही अवैध प्रकारांना येथे खतपाणी मिळत आहे. त्यामुळे हे अतिक्रमण तात्काळ काढावे, अशी मागणी हिंदू एकता आंदोलन समितीचे अध्यक्ष व महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्यकारिणीचे सचिव विक्रम पावसकर यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याकडे केली आहे.

सातारा : सातारा जिल्हा अधिकारी कार्यालय ही शासकीय जागा आहे. या परिसरात एक अनधिकृत थडगे असून त्याचे वारंवार उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे वेगळा पायंडा पडत असून काही अवैध प्रकारांना येथे खतपाणी मिळत आहे. त्यामुळे हे अतिक्रमण तात्काळ काढावे, अशी मागणी हिंदू एकता आंदोलन समितीचे अध्यक्ष व महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्यकारिणीचे सचिव विक्रम पावसकर यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याकडे केली आहे.
पावस्कर आणि भाजपच्या कार्यकारणी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रकरणाकडे त्यांचे लक्ष वेधले त्यांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे की, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ओढा आहे, त्या ओढ्यालगत असणारे थडग्याचे उदात्तीकरण होत आहे. त्याचे इस्लामीकरण केले जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. अमावस्या आणि पौर्णिमा यावेळी काही लोक येथे अंमली पदार्थाचे सेवन करून येथे वावरत असतात. त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे.
निवेदन सादर केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पावसकर म्हणाले, प्रतापगड येथील अफजलखान कबरी परिसरातील अतिक्रमणांच्या संदर्भातही लवकरच निर्णय होणार असून त्या प्रक्रियेनंतर आम्ही आनंदोत्सव साजरा करून भवानी मातेचे पूजन करणार आहे. हे निवेदन सादर करताना विकास गोसावी, राहुल शिवनामे तसेच भाजप कार्यकारिणीचे सर्व सदस्य उपस्थित होते.