maharashtra

बनावट प्लायवूड विक्रीप्रकरणी फलटणच्या व्यापार्‍यावर गुन्हा


बनावट प्लायवूड विक्री केल्याप्रकरणी चौधरवाडी, ता. फलटण येथील अमोल विलास चौधरी (वय 34) या व्यापार्‍याविरोधात कॉपीराईट अधिनियमानुसार फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

फलटण : बनावट प्लायवूड विक्री केल्याप्रकरणी चौधरवाडी, ता. फलटण येथील अमोल विलास चौधरी (वय 34) या व्यापार्‍याविरोधात कॉपीराईट अधिनियमानुसार फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याप्रकरणी हिरालाल कन्हैयालाल ठठेरा (वय 42, रा. साईनाथ नगर आंबावाडी, दहिसर पूर्व, मुंबई) यांनी फिर्याद दिली. अमोल विलास चौधरी याने त्याच्या जिंतीनाका मलटण, फलटण येथील न्यू ब्रह्मचैतन्य प्लायवूड या दुकानात प्रगती गोल्ड कंपनी नावाचे बनावड असलेले लालसर रंगाचे 12 एमएम जाडीचे 105 प्लायवूडचे बनावट नग विक्रीसाठी ठेवल्याचे आढळून आले. या मालाची किंमत 1 लाख 81 हजार 440 आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक केनेकर करत आहेत.