संवाद यात्रेच्या निमित्ताने फलटण तालुक्यातील लोकांच्या समस्या, अडचणी व त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर व भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांनी फलटण तालुक्यातील पंचायत समिती गण निहाय दौऱ्याच्या निमित्ताने राजुरी येथे आयोजित कार्यक्रमात लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या.
फलटण : संवाद यात्रेच्या निमित्ताने फलटण तालुक्यातील लोकांच्या समस्या, अडचणी व त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर व भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांनी फलटण तालुक्यातील पंचायत समिती गण निहाय दौऱ्याच्या निमित्ताने राजुरी येथे आयोजित कार्यक्रमात लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या.
यामध्ये प्रामुख्याने लोकांनी ट्रान्सफार्मर चोरी, शेती पंपाच्या विजेच अनेक प्रश्न प्रलंबित आहेत याविषयी तक्रारी दिल्या. यावर लवकर तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन संबंधित विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिले. फलटण पूर्व भागातील रस्त्यांचा प्रश्न, ओढ्यावरील पुलाचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न यासह अनेक विषयांवर लोकांनी तक्रारी सांगून तक्रारी लेखी स्वरुपात देण्यात आल्या. खासदारांनी संबंधित विभागाला तश्या पध्दतीच्या सुचना देऊन तक्रार निवारण केले जाईल, असे आश्वासन दिले. केंद्र शासनाच्या अनेक योजना आहेत त्याचा आपण फायदा करून घ्या, असेही आवाहन खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केले.
आमदार जयकुमार गोरे म्हणाले, फलटण तालुक्याची सत्ता ३० वर्ष रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे असून सुध्दा तालुक्याचा विकास झाला नाही. राज्यात व देशात भाजपचे सरकार आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हातात पंचायत समिती, जिल्हा परिषदेची सत्ता द्या, असे आवाहन त्यांनी केले.
अनेक लोकांनी आपल्या तक्रारीचे निवेदन दिले. तक्रारी देण्याचे राहिले असेल त्या लोकांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरुपात युवा नेते संतोष गावडे पाटील यांचेकडे द्याव्यात, असे सांगण्यात आले.
यावेळी जयकुमार शिंदे, पै. बजरंग गावडे, अमरसिंह नाईक निंबाळकर, नानासाहेब उर्फ पिंटू इवरे, संतोष गावडे-पाटील, शरद झेंडे, धनाजी गावडे, डाॅ. मधुकर माळवे, डाॅ. राहुल गावडे, विलास राऊत, कुलदीप गावडे, आबासाहेब खुरंगे, अमोल निकम, सुनिल पवार, गणेश पवार, विष्णू सुळ, आबासाहेब गावडे, विठ्ठल धावडे, सोमनाथ येजगर, विलास आटोळे, अनिल जाधव, सचिन पवार, संजय इंगळे, दिपक गावडे, महेश जाधव, प्रशांत गावडे, रामचंद्र खुरंगे, दिगंबर खुरंगे आदींसह राजुरी, कुरवली बुद्रुक, आंदरुड, जावली, बरड गावातील ग्रामस्थ व भाजप चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक संतोष गावडे-पाटील यांनी केले, तर आभार सोमनाथ येजगर यांनी मानले. यावेळी तलाठी, ग्रामसेवक, विज वितरण कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.


