अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा शहर परिसरात तीन लाखांच्या जबरी चोरी प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा शहरासह जिल्ह्यातील पाचजण बेपत्ता झाल्याच्या घटना संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
यंदा कोरोनाचे संकट मावळल्याने गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांनी गावी जाण्यासाठी एसटीला गर्दी केली होती. या परिवहन विभागानेही प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बसचे योग्यरीत्या संचलन केले होते. त्यामुळे सातारा एसटी विभागाच्या तिजोरीत यंदा गणेशोत्सवाच्या काळात ११ कोटी २९ लाख ८० हजारांची भर पडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारमुळे देशात आमूलाग्र बदल होवून अर्थव्यवस्था मजबूत होत आहे. सर्वच पातळ्यांवर देशाची प्रगती होत आहे. भाजपमध्ये घराणेशाहीला थारा नाही. मात्र कॉंग्रेससह राज्यातील राष्ट्रवादीच्या बारामती आणि फलटणकरांची घराणेशाही मात्र एकदम ओक्केच असल्याचा टोला भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी लगावला.
राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात परखंदी (ता वाई) हायस्कूलचा विद्यार्थी यश ज्ञानेश्वर शिंदे व मार्गदर्शक विज्ञान शिक्षक तथा मुख्याध्यापक प्रसाद यादव यांनी तयार केलेल्या मल्टीपर्पज केटरिंग मशीन या उपकरणाला राष्ट्रीय सुवर्णपदक मिळाले आहे. या प्रदर्शनात महाराष्ट्राचा प्रथमच गौरव झाला आहे
ग्राहकाच्या ठेव पावत्यांचा अपहार केल्याप्रकरणी डीसीबी बँकेने ग्राहकास दंडासह नुकसानभरपाई देण्याचे जिल्हा ग्राहक आयोगाने आदेश दिले आहेत.
बावडा, ता. खंडाळा या गावचे सुपूत्र तथा ध्येयनिष्ठ शास्त्रज्ञ, ऊस संशोधक आणि उत्तम प्राध्यापक असणार्या डॉ. सुरेश मारुती पवार यांना यंदाचा द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असो. तर्फे 2022 चा लाईफ टाईम ऍचिव्हमेंट पुरस्कार राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करुन त्यांना गौरविण्यात आले.
कधी कोवळे ऊन, तर कधी रिमझिमता पाऊस अशा कुंद वातावरणात शरीराचा दमसास राखण्यासाठी तब्बल साडेसात हजार स्पर्धक रविवारी सातारा हिल मॅरेथॉनच्या निमित्ताने धावले. यंदाच्या अकराव्या मॅरेथॉन स्पर्धेला देशी आणि परदेशी स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ढोल-ताशांच्या आणि पारंपारिक वाद्यांच्या गजरात या स्पर्धला पारंपारिक कोंदण लाभले.
खेड येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी करून 36 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली आहे.