सातारा शहरातील सदाशिव पेठ येथे वृध्द महिलेला अडवून पुढे साड्या वाटप सुरु आहे. तुम्ही इथेच बसा, असे सांगत अंगावरील दागिने काढून ठेवा, असे सांगून महिलेचे एक लाख रुपयांचा मुद्देमाल फसवणूक करत चोरुन नेला. दरम्यान, भरदुपारी घडलेल्या या घटनेने महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. फसवणूक व चोरी झाल्याचे लक्षात आल्याने महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
सातारा : सातारा शहरातील सदाशिव पेठ येथे वृध्द महिलेला अडवून पुढे साड्या वाटप सुरु आहे. तुम्ही इथेच बसा, असे सांगत अंगावरील दागिने काढून ठेवा, असे सांगून महिलेचे एक लाख रुपयांचा मुद्देमाल फसवणूक करत चोरुन नेला. दरम्यान, भरदुपारी घडलेल्या या घटनेने महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. फसवणूक व चोरी झाल्याचे लक्षात आल्याने महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. ही घटना दि. १८ रोजी घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरातील मोळाचा ओढा येथील सौ.अरुणा रामचंद्र शिंगटे वय ७0 यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. १८ रोजी घडली आहे. साड्या वाटपाचा कार्यक्रम सुरु होणार असल्याचे खोटे सांगून संशयित अनोळखी दोघांनी तक्रारदार वृध्देला थांबायला सांगितले. यावेळी संशयितांनी महिलेला अंगावरील दागिने काढून पर्समध्ये ठेवायला सांगितले. महिलेने दीड तोळ्याचे मिनीगंठण, अंगठी व रोख ४ हजार रुपये काढल्यानंतर ते बांधून देतो, असे सांगत हातचलाखीने संशयितांनी स्वत: कडे ठेवले. संशयितांनी तेथून पळ काढल्यानंतर वृध्देने पाहिले असता दागिने व पैसे नसल्याचे लक्षात आले.


