आर्यांग्ल हॉस्पिटल सारख्या ठिकाणी एक्स-रे सुविधा उपलब्ध असल्याने आम्हाला शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. 325 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. आर्यांग्ल हॉस्पिटल तर्फे अत्याधुनिक उपचार सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती संचेती हॉस्पिटलचे डॉ. कैलास पाटील यांनी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सातारा : साताऱ्यात हाड तपासणी शिबिराचे आर्यांग्ल हॉस्पिटलच्यावतीने केलेले नियोजन हा व्यवसायिक सरावाचा भाग नव्हता तर ते सामाजिक बांधिलकीचे काम होते. साताऱ्यात हाडांची घनता, ठिसूळता, हाडांचे राहणारे गॅप त्यातून निर्माण होणारे संधिवातासारखे त्रास अशा असंख्य तक्रारी रुग्णांच्या असतात. पण त्यांना बोन रिप्लेसमेंट आणि तत्सम शस्त्रक्रिया संदर्भात मोठे खर्च येत असतात. अशा शिबिरांमधून रुग्णांना मोफत आणि दर्जेदार उपचार मिळतात. आर्यांग्ल हॉस्पिटल सारख्या ठिकाणी एक्स-रे सुविधा उपलब्ध असल्याने आम्हाला शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. 325 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. आर्यांग्ल हॉस्पिटल तर्फे अत्याधुनिक उपचार सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती संचेती हॉस्पिटलचे डॉ. कैलास पाटील यांनी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. अजय कोठारी, वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन, प्रा. डॉ. विलासराव जगताप, मुथा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अजित मुथा, रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन अडसूळ, मुथा चॅरिटेबल ट्रस्टच्या शकुंतला पवार व बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र चोरगे यावेळी उपस्थित होते.
शिबिराविषयी बोलताना आयुर्वेदिक प्रसारक मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष अजित मुथा म्हणाले, आर्यांग्ल हॉस्पिटल येथे आयुर्वेदिक आणि अलोपॅथिक अशी दोन्ही पद्धतीचे उपचार सुरू आहेत. हे धर्मादाय हॉस्पिटल असल्याने कमीत कमी खर्चामध्ये दर्जेदार उपचार हा आमचा हेतू आहे. सोनोग्राफी मशीन एक्स-रे मशीन इत्यादी सारख्या सुविधा येथे उपलब्ध असून फक्त अतिदक्षता विभाग आमच्याकडे सध्या अस्तित्वात नाही मात्र पहिल्या टप्प्यांमध्ये हॉस्पिटलच्या दर्शनी भागात जुन्या इमारतींच्या ठिकाणी अद्यावत सुविधांचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल टप्प्याटप्प्याने उभे केले जाईल आणि ज्या ज्या उपचार सुविधा पुण्यात मिळतात त्याचीच अल्प दरामध्ये सोय आर्यांग्ल हॉस्पिटलच्या प्रिमायसेसमध्ये दिली जाईल. त्याकरिता ट्रस्टचे नियोजन सुरू आहे असे अजित मुथा यांनी सांगितले.