बावडा, ता. खंडाळा या गावचे सुपूत्र तथा ध्येयनिष्ठ शास्त्रज्ञ, ऊस संशोधक आणि उत्तम प्राध्यापक असणार्या डॉ. सुरेश मारुती पवार यांना यंदाचा द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असो. तर्फे 2022 चा लाईफ टाईम ऍचिव्हमेंट पुरस्कार राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करुन त्यांना गौरविण्यात आले.
सातारा : बावडा, ता. खंडाळा या गावचे सुपूत्र तथा ध्येयनिष्ठ शास्त्रज्ञ, ऊस संशोधक आणि उत्तम प्राध्यापक असणार्या डॉ. सुरेश मारुती पवार यांना यंदाचा द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असो. तर्फे 2022 चा लाईफ टाईम ऍचिव्हमेंट पुरस्कार राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करुन त्यांना गौरविण्यात आले.
डॉ. सुरेश पवार यांचे मूळ गाव खंडाळा तालुक्यातील बावडा हे असून त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण खंडाळा येथील राजेंद्र महाविद्यालयात झाले. त्यानंतर अनुक्रमे पुणे येथील कृषी महाविद्यालय तसेच राहुरी येथील कृषी महाविद्यालयात त्यांचे उच्च शिक्षण झाले. राहुरीत एमएससीचे शिक्षण घेत असतानाच त्यांची वरिष्ठ संशोधन सहाय्यक पदी निवड झाली. कृषी महाविद्यालयात वनस्पती शास्त्राचे अध्ययन तसेच छात्रसेवा अधिकारी म्हणून आठ वर्षे सेवा बजावली. त्यांनी वनस्पती शास्त्रात पीएचडी करुन डॉक्टरेट मिळवली. कमी पाण्यात येणार्या ज्वारीचे जास्त उत्पन्न कसे करता येईल, याचे संशोधन केल्यामुळे कर्नाटक राज्याचे तत्कालीन राज्यपाल खुर्शिद आलम खान यांच्या हस्ते सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले होते. पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्रामध्ये ते अनेक वर्षे कार्यरत होते. या कार्यकालामध्ये उसाच्या अनेक नवीन प्रजाती शोधून काढून त्यांनी खर्या अर्थाने महाराष्ट्रातील शेतकर्यांचा फायदा करुन दिला. त्यांच्या या संशोधनामुळे उसाचे भरघोस उत्पन्न शेतकर्यांना मिळू लागले. त्यामुळे राज्यभरातील शेतकर्यांसह साखर कारखानदारांनाही त्याचा फायदा झाला. राज्यभरासह देशभरातील हजारो शेतकर्यांना त्यांनी शेतीविषयक मार्गदर्शन केले. राज्याच्या कृषी क्षेत्रामध्ये त्यांचे नाव अतिशय आदराने घेतले जाते. आयुष्यभर त्यांनी आपला अमूल्य वेळ हा शेतकी संशोधनामध्ये घालवला. याचीच दखल घेवून पुणे येथील द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्यावतीने 2022 चा टाईम ऍचिव्हमेंट ऍवार्ड रविवार दि. 18 सप्टेंबर रोजी पुणे येथील डे डब्ल्यू मेरियट या पंचतारांकित हॉटेलमधील ऑडिटोरियममध्ये देशाचे माजी कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी पार्टीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याहस्ते देण्यात आला.
यावेळी माजी जलसंपदामंत्री जयंत पाटील, साखर आयुक्त शेखर गायकवाड, द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असो.चे अध्यक्ष एस.एस. गंगावती व विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार डॉ. पवार यांना मिळाल्याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.


