सातारा शहरासह जिल्ह्यातील पाचजण बेपत्ता झाल्याच्या घटना संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यातील पाचजण बेपत्ता झाल्याच्या घटना संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास समता केअर सेंटर, देगाव येथून शेखर निवृत्ती माने वय 60, रा. विसावा नाका, पिरवाडी, सातारा हे कोणास काही एक न सांगता निघून गेले आहेत. याबाबतची खबर सिद्धार्थ श्रीपती माने वय 31 राहणार कुपर कॉलनी, सदर बाजार, सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
दुसऱ्या घटनेत दि. 17 सप्टेंबर रोजी सात वाजण्याच्या सुमारास आगाशिवनगर, कराड येथून सुनील सतीश कसबे वय 20 हा राहत्या घरातून कोणास काही न सांगता निघून गेला आहे. याबाबतची खबर सुजित सतीश कसबे वय 25 यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
तिसऱ्या घटनेत दि. 14 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास आरांगण सोसायटी शिरवळ तालुका खंडाळा येथील राहत्या घरातून ओंकार महेंद्र मस्के वय 23 हा युवक घरात वाद घालून काही एक न सांगता निघून गेला आहे. याबाबतची खबर सानिया ओंकार मस्के वय 23 यांनी शिरवळ पोलीस ठाण्यात दिली आहे.
चौथ्या घटनेत दि. 16 सप्टेंबर रोजी नऊ वाजण्याच्या सुमारास उंब्रज येथील दवाखान्यात जाते, असे सांगून संपदा जितेंद्र रावते वय 24, रा. इंदोली ता. कराड ही युवती राहत्या घरातून निघून गेली आहे. याबाबतची खबर जयश्री जितेंद्र रावते वय 46 यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात दिली आहे.
पाचव्या घटनेत दि. 16 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान रविवार पेठ वाई येथील राहत्या घरातून साक्षी अक्षय मांढरे वय 19 ही युवती घरातील कोणास काही न सांगता निघून गेली आहे. याबाबतची खबर अक्षय सुभाष मांढरे वय 27 यांनी वाई पोलीस ठाण्यात दिली आहे.


