सातारा शहर परिसरात तीन लाखांच्या जबरी चोरी प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : सातारा शहर परिसरात तीन लाखांच्या जबरी चोरी प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 17 सप्टेंबर रोजी रात्री पावणे नऊ वाजता सुमारास निशिगंधा कॉलनी, सर्विस रोडवर, संभाजीनगर, सातारा या ठिकाणाहून गणेश साहेबराव पाटील राहणार निशिगंधा कॉलनी, संभाजीनगर, सातारा हे दुचाकीवरून निघाले असता दोन अनोळखी इसमांनी त्यांची बिना नंबरची एक्टिवा मोटरसायकल आडवी मारून गणेश पाटील यांना शिवीगाळ करून लोखंडी रॉडने मारहाण करीत त्यांच्या गळ्यातील सहा तोळे वजनाची तीन लाख रुपये किमतीची सोन्याची साखळी जबरीने चोरून नेली आहे. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे करीत आहेत.


